Cooker Tips : प्रत्येक स्वयंपाकघरात प्रेशर कुकर हा एक अत्यावश्यक भाग बनला आहे. कारण त्याच्या मदतीने अन्न पटकन आणि सहज तयार होतं. पण प्रत्येक गोष्ट प्रेशर कुकरमध्ये बनवणं योग्य नसतं. काही पदार्थ असेही असतात, जे कुकरमध्ये शिजवल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक आणि विषारी ठरू शकतात. अशात आपण पाहणार आहोत की, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना प्रेशर कुकरमध्ये शिजवणं टाळायला हवं.
प्रेशर कुकरचा वापर आज जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात होतो. लोक रोजच वेगवेगळे पदार्थ त्यात शिजवतात कारण यामुळे वेळ वाचतो. पण आपल्याला माहिती नसेल की, काही खाद्यपदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होतात आणि काही वेळा ते आरोग्यासाठी हानिकारक विषारी रूप घेतात.
बटाटे
प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवल्यास त्यातील नैसर्गिक पोषक तत्त्वे मोठ्या प्रमाणात नष्ट होतात. तसेच यात अॅक्रिलामाइड नावाचं हानिकारक रसायन तयार होऊ शकतं, जे शरीरासाठी धोकादायक असतं.
पालक
पालक कुकरमध्ये शिजवल्यास त्यातील ऑक्सलेट्स वाढतात. हे तत्व किडनीसाठी घातक असतं. कारण यामुळे किडनीत स्टोन तयार होण्याचा धोका असतो. त्यामुळे पालक कुकरऐवजी उघड्या पॅनमध्ये किंवा थोडं उकळून शिजवणं अधिक योग्य.
तांदूळ
कुकरमध्ये भात शिजवताना त्यातील फायटिक अॅसिड पूर्णपणे नष्ट होत नाही. त्यामुळे हा भात पचायला कठीण होतो आणि ब्लड शुगर लेव्हल वाढवू शकतो. डायबिटीस असलेल्या लोकांसाठी हे विशेषतः घातक ठरू शकतं.
प्रेशर कुकरचा वापर सोयीचा असला तरी सर्व पदार्थ त्यात शिजवणे योग्य नाही. त्यामुळे अशा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि आरोग्य सुरक्षित ठेवा.