Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बिया आहारात असणे फायद्याचे, पाहा किती उपयुक्त आहेत या बिया

कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बिया आहारात असणे फायद्याचे, पाहा किती उपयुक्त आहेत या बिया

onion seeds are beneficial in the diet, see how useful these seeds are, kalonji is must have food : कांद्याच्या बिया आहारात असण्याचे फायदे जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2025 17:09 IST2025-11-10T17:08:41+5:302025-11-10T17:09:58+5:30

onion seeds are beneficial in the diet, see how useful these seeds are, kalonji is must have food : कांद्याच्या बिया आहारात असण्याचे फायदे जाणून घ्या.

onion seeds are beneficial in the diet, see how useful these seeds are, kalonji is must have food | कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बिया आहारात असणे फायद्याचे, पाहा किती उपयुक्त आहेत या बिया

कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बिया आहारात असणे फायद्याचे, पाहा किती उपयुक्त आहेत या बिया

कलोंजी म्हणजे काळ्या बिया ज्याला कांद्याच्या बियाही म्हटले जाते. आकाराने लहान पण आरोग्यदृष्ट्या अत्यंत प्रभावी असतात. भारतीय स्वयंपाकात ती मसाल्याच्या स्वरुपात वापरली जाते, पण तिचे औषधी गुण अतिशय मौल्यवान आहेत. (onion seeds are beneficial in the diet, see how useful these seeds are, kalonji is must have food )या बिया आजकाल कमी वापरल्या जातात मात्र त्या आहारात असाव्यात कारण त्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतात.

कलोंजीमध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात जी शरीरासाठी आवश्यक आहेत. त्यात प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असते. तसेच त्यात वजीवनसत्त्व B-कॉम्प्लेक्स (B1, B2, B3, B6) यांचा समावेश असतो. या घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि त्वचा-केस निरोगी राहतात. कलोंजीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकतात आणि त्वचा सुंदर ठेवण्याची प्रक्रिया सुरु करतात.

कलोंजीचे आरोग्यदायी फायदे:
कलोंजीचे नियमित सेवन केल्याने पचनसंस्था बळकट होते. अ‍ॅसिडिटी, गॅस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या त्रासांवर ती परिणामकारक ठरते. तिच्या उष्ण गुणधर्मांमुळे थंडी, खोकला, घसा बसणे किंवा सर्दी झाल्यास ती औषधाप्रमाणे काम करते. कलोंजीतील सक्रिय घटक रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात, त्यामुळे मधुमेह आणि हृदयरोग असणाऱ्यांसाठीही ती उपयुक्त आहे. हृदयासाठी या बिया फारच फायद्याच्या असतात. आरोग्यासाठी फार उपयुक्त असतात. 

कलोंजी रोगप्रतिकारशक्ती वाढवते. नियमितपणे घेतल्यास ती संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करते. त्वचेसाठी ती नैसर्गिक टॉनिकप्रमाणे कार्य करते. कलोंजी तेल लावल्यास मुरुम, डाग, डार्क सर्कल्स कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तजेला येतो. केसांसाठीही कलोंजी औषधासारखी आहे. तिचं तेल डोक्याला लावल्यास केस गळणे थांबते, केस दाट आणि काळे होतात.


कलोंजीचा आहारात समावेश विविध प्रकारे करता येईल. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा कलोंजी गिळल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचन सुधारते. कलोंजी मधात मिसळून घेतल्यास सर्दी, खोकला, थकवा यावर आराम मिळतो आणि प्रतिकारशक्ती वाढते. भाजून घेतलेली कलोंजी भाजी, दही, पराठे किंवा सलाडवर घालायची. ती चव आणि आरोग्य दोन्हीसाठी चांगली असते.

थोडक्यात, कलोंजी हा छोटासा पण अत्यंत गुणकारी आहार घटक आहे. नियमित आणि योग्य प्रमाणात खाल्याने शरीर निरोगी, ताजेतवाने आणि ऊर्जादायी राहते. ती केवळ मसाला नसून एक नैसर्गिक औषध आहे, जे आधुनिक काळातही आपल्या दैनंदिन आहारात असायलाच हवे.

Web Title : कलौंजी (प्याज के बीज): स्वास्थ्य लाभ और आहार में उपयोग

Web Summary : कलौंजी, या प्याज के बीज, पोषक तत्वों से भरपूर होते हैं और प्रतिरक्षा को बढ़ावा देते हैं। वे पाचन में सहायता करते हैं, रक्त शर्करा और दबाव को नियंत्रित करते हैं, और त्वचा और बालों के स्वास्थ्य में सुधार करते हैं। समग्र कल्याण के लिए इन्हें अपने आहार में शामिल करें।

Web Title : Kalonji (Onion Seeds): Health Benefits and Uses in Your Diet

Web Summary : Kalonji, or onion seeds, are nutrient-rich and boost immunity. They aid digestion, control blood sugar and pressure, and improve skin and hair health. Incorporate them into your diet for overall well-being.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.