बऱ्याचदा असं होतं की आपण केलेली भाजी सगळ्यांसाठी पुरते की नाही असं वाटतं. किंवा काही वेळेस असंही होतं की घरात कांद्याशिवाय इतर कोणतीच भाजी नसते. अशावेळी जेवणासाठी नेमकं काय करावं, हा प्रश्न पडतोच. म्हणूनच कच्च्या कांद्याची ही झटपट होणारी भाजी रेसिपी बघा आणि एकदा नक्की ट्राय करा. ही कांद्याची भाजी तुम्ही पोळी, पराठा, भात, भाकरी अशी कशा सोबतही खाऊ शकता (instant kanda chutney recipe in 5 minutes). शिवाय भाजी करायला खूप कमी वेळ लागतो (how to make delicious onion chutney?) आणि खूप जास्त तयारी करण्याची गरजही नसते.(onion sabji recipe)
कच्च्या कांद्याची भाजी करण्याची रेसिपी
साहित्य
२ मध्यम आकाराचे कांदे
१ चमचा धनेपूड
१ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
५ ते ६ लसूण पाकळ्या
चवीनुसार लाल तिखट आणि मीठ
फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी आणि हिंग
कृती
कांद्याची झटपट भाजी करण्यासाठी कांदाची देठं काढून घ्या. त्यानंतर कांद्याची टरफलं काढून कांदे ओबडधोबड चिरून घ्या.
यानंतर चिरलेले कांदे आणि लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात घालून कुटून घ्या.
त्यातच तिखट, मीठ, धनेपूड घाला आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित कुटून घ्या.
कुटलेली चटणी किंवा भाजी एका भांड्यामध्ये काढा आणि तिला वरून कडकडीत खमंग फोडणी घाला.
अतिशय चटपटीत चवीची कांद्याची चटणी तयार. या चटणीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ती सर्व्ह करा.. कांद्याच्या या भाजीमध्ये तुम्ही १ चमचा पावभाजी मसाला आणि १ चमचा किचन किंग मसालाही घालू शकता. चवीत आणखी छान बदल होईल.
