Join us

Onion rice recipe : झटपट करा चमचमीत कांदे भात,शाळा - ऑफिसच्या डब्यासाठी खास- सगळेच रेसिपी मागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2025 15:19 IST

Onion rice recipe: Make instant onion rice, special for school - office tiffins- everyone will ask for the recipe : चवीला जबरदस्त असा कांदे भात नक्की करा. लहान मुलांनाही आवडेल.

कांदे भात हा महाराष्ट्रात केला जाणारा फार चविष्ट पदार्थ आहे. फोडणीचा भात, मसाले भात, बटाटे भात, वांगी भात, तोंडली भात असे विविध प्रकार केले जातात. त्यापैकीच एक मस्त रेसिपी म्हणजे कांदे भात. (Onion rice recipe: Make instant onion rice, special for school - office tiffins- everyone will ask for the recipe)हा करायला अगदीच सोपा असतो. तसेच सामग्रीही घरात असलेलीच वापरायची असते. त्यामुळे कधीही पटकन करता येतो. अगदी झटपट होतो. त्यामुळे एकदा नक्की करुन पाहा. सोबत लोणचं, चटणी असे पदार्थ घ्या. तसेच कोशिंबीर पण सोबत असावी. चव छान लागते.   

साहित्य कांदे, तांदूळ, पाणी, आलं, काळीमिरी, तमालपत्र, लसूण, तेल, लिंबू, कोथिंबीर, तेल, जिरं, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, ओले खोबरे, कडीपत्ता, मोहरी, मीठ

कृती१. तांदूळ स्वच्छ धुवायचे. जरा पाण्यात ठेवायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या आणि ठेचून घ्यायच्या. आल्याचा तुकडा किसून घ्यायचा. लहान आकाराचे कांदे घ्यायचे. कांदे सोलायचे. जर अख्खा कांदा आवडत नसेल तर त्याचे दोन तुकडे करायचे. या रेसिपीसाठी कांदा अख्खाच ठेवायचा. कोथिंबीर निवडायची. स्वच्छ धुवायची आणि नंतर बारीक चिरायची. 

२. एका कुकरमध्ये तेल घ्यायचे. त्यात जिरे घालायचे तसेच मोहरी घालायची. फोडणी तडतडल्यावर त्यात तमालपत्र घालायचे. तसेच काळीमिरी घालायची. कडीपत्ता घालायचा.  किसलेले आले घालायचे. ठेचलेली लसूण घालायची. चमचाभर हिंग घालायचे. तसेच हळद घालायचे. लाल तिखट घालायचे. फोडणी छान परतायची आणि त्यात कांदे घालायचे. कांदे छान परतायचे. थोडे ओले खोबरे घालायचे. कांदे मस्त परतायचे. अर्धे शिजले की त्यात तांदूळ घालायचे. पाणी घालायचे. मग त्यात मीठ घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तसेच लिंबू पिळायचा. 

३. त्यात तांदूळ घालायचे. एक उकळी काढायची. मग कुकर लावायचा आणि दोन शिट्या काढायच्या. भात मोकळा छान होतो. जरा मऊसर होतो. शिट्या जास्त काढू नका लगदा होतो.    

English
हिंदी सारांश
Web Title : Quick & Easy Onion Rice Recipe: Perfect for Lunchboxes!

Web Summary : Onion rice, a Maharashtrian favorite, is quick and simple to make with readily available ingredients. Sauté onions with spices, add rice and water, and cook in a cooker. A delicious and convenient dish ready in minutes.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स