खिचडी हा पदार्थ भारतात घरोघरी खाल्ला जातो. बरं नाही वाटत नसताना लगेच खिचडी खाण्याचा विचार मनात येतो. घरी अचानक पाहुणे जेवायला आले, खिचडीभात, लोणचं, पापड हा बेत आपण ठरवतो. (One pot meal: Make delicious masala khichdi in just five minutes, tasty and light on the stomach - make it quickly)तसेच रात्रीच्या जेवणासाठी अनेकदा खिचडी केली जाते. अर्थात त्याच्या अनेकविध रेसिपी आहेत. अशीच एक खास रेसिपी म्हणजे ही वन पॉट मसाला खिचडी. एकदाच कुकर लावायचा आणि बाकी काम काही नाही. परतायची गरज नाही किंवा भाजायचीही गरज नाही. फक्त कुकर लावायचा. पाहा किती मस्त रेसिपी आहे.
साहित्य
तांदूळ, मसूर डाळ, हिरवी मूग डाळ, पिवळी मूग डाळ, पाणी, टोमॅटो, सिमला मिरची, बीट, गाजर, मटार, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, तूप, कोथिंबीर
कृती
१. तांदूळ स्वच्छ धुवायचे. तसेच हिरवी मूगडाळ आणि पिवळी मूगडाळ धुवायची. टोमॅटोच्या मध्यम आकाराच्या फोडी करायच्या. बीटाच्या मध्यम फोडी करुन घ्यायचा. सिमला मिरची चिरुन घ्यायची. गाजर सोलायचे. गाजराचे बारीक तुकडे करायचे. मटार सोलायचे आणि मटारचे दाणे घ्यायचे. प्रमाण तुम्ही खिचडीसाठी जसं घेता अगदी तसंच घ्या. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची. छान निवडायची आणि मग धुवायची. स्वच्छ केल्यावर बारीक चिरायची.
२. एका कुकरमध्ये धुतलेले तांदूळ घ्यायचे. त्यात हिरवी मूगडाळ घालायची आणि पिवळी मूगडाळही घालायची. त्यात टोमॅटोचे तुकडे घालायचे. सिमला मिरची घालायची. बीटाचे तुकडे घालायचे. त्यात गाजराचे तुकडे घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. चवीचा अंदाज घ्यायचा आणि मीठ घालायचे. त्यात चमचाभर हळद घाला. लाल तिखट घाला. त्यात गरजे पुरते पाणी घाला. वरतून दोन चमचे तूप घाला. कुकर लावा.
३. कुकर गॅसवर चढवा आणि किमान तीन ते चार शिट्या काढा. नंतर थोडावेळ मंद आचेवर कुकर ठेवायचा. गॅस बंद करायचा. थोड्या वेळाने कुकर उघडला की गरमागरम मऊ अशी खिचडी तयार झालेली असेल. काहीही न परता सुद्धा मस्त मसाला खिचडी करता येते.