Lokmat Sakhi >Food > One pot Meal : काळ्या चण्यांचा भात! एकदम चमचमीत पोटभरीची आणि पौष्टिक रेसिपी, झटपट करता येते

One pot Meal : काळ्या चण्यांचा भात! एकदम चमचमीत पोटभरीची आणि पौष्टिक रेसिपी, झटपट करता येते

One pot Meal: Black gram rice! A very filling and nutritious recipe, easy and tasty recipes : चव आणि पोषण दोन्हींनी परिपूर्ण असा हा भात खा. करायला सोपा आणि झटपट होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2025 14:44 IST2025-08-06T14:44:18+5:302025-08-06T14:44:57+5:30

One pot Meal: Black gram rice! A very filling and nutritious recipe, easy and tasty recipes : चव आणि पोषण दोन्हींनी परिपूर्ण असा हा भात खा. करायला सोपा आणि झटपट होतो.

One pot Meal: Black gram rice! A very filling and nutritious recipe, easy and tasty recipes | One pot Meal : काळ्या चण्यांचा भात! एकदम चमचमीत पोटभरीची आणि पौष्टिक रेसिपी, झटपट करता येते

One pot Meal : काळ्या चण्यांचा भात! एकदम चमचमीत पोटभरीची आणि पौष्टिक रेसिपी, झटपट करता येते

विविध प्रकारच्या भाताच्या रेसिपी आपण करत असतो. अशीच एक मस्त, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी म्हणजे हा काळ्या चण्यांचा भात. काळ्या चण्यात भरपूर फायबर्स असतात. (One pot Meal: Black gram rice! A very filling and nutritious recipe, easy and tasty recipes)पचनासाठी ते फायद्याचे असतात. तसेच त्यात प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि इतरही गुणधर्म असतात. त्यामुळे हा भात आरोग्यासाठी नक्कीच चांगला आहे. घरी असलेला कोणताही तांदूळ वापरु शकता. मात्र बासमती तांदूळ असेल तर भात जास्त मोकळा आणि छान होईल. 

साहित्य
काळे चणे, बासमती तांदूळ, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, मीठ, धणे-जिरे पूड, गरम मसाला, जिरं, तेल, पाणी, कोथिंबीर 

कृती
१. काळे चणे रात्रभर भिजवायचे. कांदा सोलायचा आणि त्याचे तुकडे करुन घ्यायच्या. तसेच टोमॅटोच्याही फोडी करुन घ्यायच्या. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. कोथिंबीर बारीक चिरुन घ्यायची. कोथिंबीरीच्या काड्या फेकू नका. त्याही वापरायच्या.  

२. एका मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे तुकडे घ्यायचे. त्यात टोमॅटोचे तुकडे घालायचे. तसेच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि हिरव्या मिरचीचे तुकडेही घालायचे. आल्याचा लहानसा तुकडा घालायचा. कोथिंबीरच्या काड्या घालायच्या. थोडे पाणी घालून त्याची घट्ट पेस्ट वाटून घ्यायची. जास्त पातळ करु नका. पाणी अगदी थोडेच घाला. 

३. बासमती तांदूळ धुवायचा. दोन ते तीन पाण्यातून काढून स्वच्छ करायचा. एका कुकरमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेल जरा कोमट झाल्यावर त्यात जिरे घालायचे आणि फोडणी करायची. जिरं जरा फुलल्यावर त्यात तयार केलेला मसाला घालायचा आणि मस्त परतायचा. मसाला छान परतून झाल्यावर त्यात हळद, मीठ, लाल तिखट घालायचे आणि काळे चणे घालून जरा परतायचे. 

४. थोड्या वेळाने मसाला आटायला लागला की थोडे पाणी घाला आणि बासमती तांदूळ घालून जरा उकळू द्या. एक उकळी आल्यावर त्यात कोथिंबीर घालायची. मग कुकरचे झाकण बंद करायचे. एका शिटीत भात होतो. कुकर नुसार शिट्यांचा अंदाज घ्या. कुकर उघडल्यावर गरमागरम भात दही, कोशिंबीर अशा पदार्थांसोबत खा.

 

Web Title: One pot Meal: Black gram rice! A very filling and nutritious recipe, easy and tasty recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.