मटार हिवाळ्यात छान ताजे मिळतात. त्यामुळे आठवड्यातून तीन - चार वेळा मटार खाल्ला जातो. सगळ्यात मटार वापरला जातो. भाजीत, भातात, पोह्यतही आणि उपम्यातही. हिवाळ्यात मटारचे विविध पदार्थ खालच. (Once your kids eat Matar Paneer Paratha, they will ask for it again and again, both the nutrition and taste are amazing!)मटार पराठा सगळे आवडीने खातात. त्याचाच एक प्रकार म्हणजे मटार पनीर पराठा. अगदी सोपी रेसिपी आहे. पण चवीला एकदम जबरदस्त. पाहा हा पराठा कसा करायचा.
साहित्य मटार, गव्हाचे पीठ, तांदूळाचे पीठ, पनीर, कोथिंबीर, बटर, पाणी, मीठ, लाल तिखट, धणे - जिरे पूड, तेल, लसूण
कृती१. एका परातीत गव्हाचे पीठ घ्यायचे. त्यात चमचाभर तांदूळाचे पीठ घालायचे. नंतर त्यात थोडे मीठ घालायचे. चार चमचे तेल गरम करायचे, गरमागरम कढत तेल पिठात ओतायचे. पीठ छान एकजीव करायचे. तेल पिठाला मस्त लागले की त्यात पाणी ओतून पीठ मळून घ्यायचे. मऊसर असे मध्यम घट्ट पीठ मळायचे.
२. पनीर किसून घ्यायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. नंतर लसूण ठेचायचा. मटार शिजवून घ्यायचे. जास्त नाही थोडेच. अगदी लगदा करायचा नाही. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेल तापल्यावर त्यावर ठेचलेला लसूण परतून घ्यायचा. त्यात मटार घालायचे. पनीर घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. चमचाभर लाल तिखट घालायचे. तसेच चमचाभर धणे - जिरे पूड घालायची. चवीपुरते मीठ घालायचे.
३. मस्त ढवळायचे आणि परतून घ्यायचे. त्यात थोडे बटर घाला आणि एक वाफ काढून घ्यायची. मिश्रण गार करत ठेवायचे. गार झाल्यावर पिठाचे गोळे करायचे. त्यात सारण भरायचे. गव्हाचे पीठ घ्यायचे. म्हणजे पराठा चांगला लाटला जातो. पराठा मस्त लाटायचा आणि तव्याला बटर लावून त्यावर परतायचा. तेल वापरले, तूप वापरले तरी चालेल. मस्त खमंग करुकुरीत परतायचा. दोन्ही बाजूंनी खमंग होतो. हिरवी चटणी, सॉस किंवा दह्याशी खा. मस्त लागतो. एकदम चविष्ट आणि पौष्टिकही.
Web Summary : Make delicious Matar Paneer Paratha easily! Mix wheat flour with rice flour, add hot oil, and knead. Sauté garlic, add peas, paneer, coriander, spices, and butter. Stuff dough, roll, and cook with butter until golden. Serve with chutney or curd.
Web Summary : आसान तरीके से स्वादिष्ट मटर पनीर पराठा बनाएं! गेहूं के आटे को चावल के आटे के साथ मिलाएं, गरम तेल डालें और गूंध लें। लहसुन भूनें, मटर, पनीर, धनिया, मसाले और मक्खन डालें। आटे को भरें, बेलें और मक्खन के साथ सुनहरा होने तक पकाएं। चटनी या दही के साथ परोसें।