Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > मसूरडाळीची ‘अशी’ पारंपरिक आमटी एकदा खाल्ली तर नेहमी कराल, पचायला सोपी आणि चव अप्रतिम

मसूरडाळीची ‘अशी’ पारंपरिक आमटी एकदा खाल्ली तर नेहमी कराल, पचायला सोपी आणि चव अप्रतिम

Once you try this traditional masoor dal recipe you'll always love it, It's easy to digest and tastes amazing : चवीला मस्त आणि करायला सोपी. मसूरडाळ आमटी करण्याची रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2026 15:20 IST2026-01-12T15:15:43+5:302026-01-12T15:20:21+5:30

Once you try this traditional masoor dal recipe you'll always love it, It's easy to digest and tastes amazing : चवीला मस्त आणि करायला सोपी. मसूरडाळ आमटी करण्याची रेसिपी.

Once you try this traditional masoor dal recipe you'll always love it, It's easy to digest and tastes amazing. | मसूरडाळीची ‘अशी’ पारंपरिक आमटी एकदा खाल्ली तर नेहमी कराल, पचायला सोपी आणि चव अप्रतिम

मसूरडाळीची ‘अशी’ पारंपरिक आमटी एकदा खाल्ली तर नेहमी कराल, पचायला सोपी आणि चव अप्रतिम

आपण आहारात विविध डाळी खातो. त्यापैकी एक म्हणजे मसूरडाळ. मसूरडाळीचे वरण आहारात समाविष्ट केल्यास शरीराला अनेक पोषणद्रव्ये मिळतात. मसूरडाळ प्रथिनांनी समृद्ध असल्याने स्नायू मजबूत ठेवण्यास आणि शरीराची ताकद वाढवण्यास मदत होते. यात भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि अशक्तपणा कमी होतो. मसूरडाळीत असलेले फायबर पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते आणि पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. (Once you try this traditional masoor dal recipe you'll always love it, It's easy to digest and tastes amazing.)त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. मसूरडाळीचे वरण हलके आणि सहज पचणारे असल्याने आजारी व्यक्ती, लहान मुले आणि वयोवृद्धांसाठी ते उपयुक्त ठरते. याशिवाय मसूरडाळीत अँटी ऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीरातील दाह कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नियमित मसूरडाळीचे वरण आहारात घेतल्यास शरीराला संतुलित पोषण मिळते आणि रोजच्या जेवणाला पौष्टिक वळण मिळते. पाहा कशी करावी चविष्ट आणि पोषक डाळ. 

साहित्य 
मसूरडाळ, हिरवी मिरची, टोमॅटो, लसूण, जिरे, मीठ, हळद, लाल तिखट, धणे पूड, पाणी, तूप, मोहरी, हिंग, कडीपत्ता, कोथिंबीर 

कृती
१. मसूरडाळ स्वच्छ धुवायची आणि थोडा वेळ भिजत ठेवायची. हिरव्या मिरचीचे लांब तुकडे करायचे. टोमॅटोचे तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. एका कुकरमध्ये भिजवलेले मसूरडाळ घ्यायची. त्यात लसणाच्या पाकळ्या घालायच्या. तसेच टोमॅटोचे तुकडे घालायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. थोडे मीठ घाला. चमचाभर हळद घालायची. तसेच थोडी धणे पूड घाला आणि लाल तिखटही घाला. त्यात गरजेनुसार पाणी ओता. कुकर लावा आणि मस्त शिजू द्या. 

२. एका फोडणी पात्रात चमचाभर तूप घ्या. तुपात बारीक चिरलेला लसूण घाला. त्यात कडीपत्याची पाने घालायची. छान परतून घ्यायचे. त्यात चमचाभर जिरे घाला. थोडी मोहरी घाला. हिंग घाला आणि फोडणी परतून घ्या. त्यात थोडे लाल तिखट घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्या. तयार फोडणी वरणात ओता. ढवळा एक उकळी काढा. मस्त गरमागरम भातासोबत खा. 

Web Title : स्वादिष्ट और स्वास्थ्यवर्धक मसूर दाल रेसिपी: पचाने में आसान, स्वाद लाजवाब।

Web Summary : मसूर दाल प्रोटीन से भरपूर, पाचन में सहायक और रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाने वाली होती है। टमाटर और मसालों जैसी सरल सामग्री से बनी यह पारंपरिक रेसिपी बनाने में आसान है। यह स्वादिष्ट और पौष्टिक व्यंजन चावल के साथ परोसने के लिए एकदम सही है।

Web Title : Delicious and healthy Masoor Dal recipe: Easy to digest, amazing taste.

Web Summary : Masoor dal is protein-rich, aids digestion, and boosts immunity. This traditional recipe, featuring simple ingredients like tomatoes and spices, is easy to prepare. A flavorful and nutritious dish, perfect with rice.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.