Join us

खरपूस भाजलेल्या बटाट्याची खमंग भाजी तुम्ही एकदा खा, पोट भरलं तरी खातच राहाल.. पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2025 12:51 IST

Once you eat this delicious dish of roasted potatoes, you will keep eating it even when your stomach is full.. See the recipe : बटाटा भाजून करा मस्त चमचमीत भाजी. चवीला छान ,करायला सोपी.

बटाट्याची भाजी सगळ्यांच्याच आवडीची असते. विविध प्रकारे ही भाजी करता येते. चवीला सगळेच प्रकार मस्त लागतात. बटाटा शिजवून, वाफवून, उकडून, परतून सगळ्या पद्धतीने करता येतो. तसेच भाजूनही करता येतो. (Once you eat this delicious dish of roasted potatoes, you will keep eating it even when your stomach is full.. See the recipe)भाजलेल्या बटाट्याची भाजीही चवीला मस्त लागते. करायलाही अगदी सोपी आहे. त्यामुळे एकदा नक्की करुन पाहा. तसेच पंधरा मिनिटांत होते. एकदा पदार्थ भाजून घेतले की मसाला अगदी पाच मिनिटांत तयार होतो. 

साहित्यबटाटा, टोमॅटो, लसूण, धणे, लाल मिरची, दही, कोथिंबीर, हिरवी मिरची, तेल, मीठ, लाल तिखट, जिरे 

कृती१. गॅसवर जाळी ठेवा. गॅस चालू करा आणि त्यावर बटाटे ठेवा. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या. सालं काळी होऊ द्या म्हणजे छान भाजले जाईल. टोमॅटोही भाजून घ्यायचा. सगळ्या बाजूंनी भाजा. त्याचीची सालं कळी होऊ द्यायची. लसणाच्या काही जाड पाकळ्याही भाजून घ्या. साला सकट भाजायचे. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे भरुन धणे घ्या. त्यात तीन चमचे जिरे घालायचे. तसेच सुकी लाल मिरचीची घालायची आणि मसाला वाटायचा. बटाट्याची सालं काढायची. टोमॅटोचीही सालं काढायची. सलूण सोलायचा. हाताने तिन्ही पदार्थ एकत्र कुस्करायचे. त्याची पेस्ट तयार करा. हाताने किंवा कुटणीने करा. मिक्सरमध्ये अगदीच पातळ होईल. जरा जाडसर पेस्ट करायची. 

३. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. कोथिंबीर बारीक चिरायची. गॅसवर जरा खोलगट तवा ठेवायचा. तवा नसेल वापरायचा तर पॅनही वापरु शकता. तव्यावर तेल घालायचे आणि त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. परतून घ्यायचे. तयार केलेली पेस्ट घालायची. परतायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ढवळायचे. थोडे पाणी घातले तरी चालेल. नाही घातले तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ घाला, चमचाभर हळद घाला, लाल तिखट घाला. छान परतून घ्या.   

English
हिंदी सारांश
Web Title : Roasted Potato Delight: A Simple, Flavorful Dish You'll Crave.

Web Summary : Roasted potato sabzi is a quick, delicious dish. Roast potatoes, tomatoes, and garlic. Grind spices, mash roasted vegetables, and sauté with green chilies and coriander. Season and serve.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स