Join us
Daily Top 2Weekly Top 5

पौष्टिक पारंपरिक सिंधी कढी आणि गरमागरम भात-स्पेशल बेत चव लाजबाब! पाहा सिंधी कढीची खास रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2026 13:17 IST

Nutritious traditional Sindhi kadhi - special recipe, tastes amazing! Check out the perfect recipe : सिंधी कढी करण्याची सोपी रेसिपी, फारच चविष्ट.

सिंधी कढी ही एक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट डिश आहे, जी इतर कढी रेसिपीपेक्षा वेगळी ठरते कारण ती दही न वापरता बनवली जाते. या कढीचा बेस फक्त बेसन असतो. त्यात चिंच किंवा कोकम घालून आंबटपणा आणला जातो, ज्यामुळे तिची चव खास आंबट-तिखट लागते. ही कढी बनवताना सुरुवातीला तेलात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि सुक्या मिरच्यांची फोडणी दिली जाते. (Nutritious traditional Sindhi kadhi - special recipe, tastes amazing! Check out the perfect recipe )त्यानंतर बेसन घालून थोडे भाजले जाते, त्यामुळे कढीला छान रंग आणि सुगंध येतो. मग त्यात पाणी आणि चिंचेचा कोळ घालून उकळी आणली जाते. या कढीत बटाटे, भेंडी, गाजर, फुलकोबी, विविध भाज्या असतात  त्यामुळे, अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट होते. भेंडी वेगळी परतून घातल्याने कढी चिकट होत नाही. सिंधी कढी सहसा गरम भात आणि पापडाबरोबर खाल्ली जाते. 

साहित्य तेल, बेसन, बटाटा, वांगी, भेंडी, गवार, फ्लॉवर, चिंच, मीठ, हळद, लाल तिखट, कडीपत्ता, मेथी दाणे, हींग, मोहरी, जिरे, पाणी, टोमॅटो , सुकी लाल मिरची 

कृती१.  एका कढईत तोल घ्यायचं. दोन पळ्या तरी तेल घ्या. वांग्याला मधोमध चिरा आणि त्याचे दोन काप करा. तुकडे मोठेच ठेवायचे, तळून घ्यायचे. नंतर भेंडीचे लांब तुकडे करायचे आणि भेंडीही परतून घ्यायची. फ्लॉवरचे तुकडे करायचे आणि छान परतून घ्यायचे. गवारही निवडायची त्याचे तुकडे करायचे आणि परतून घ्या. सगळ्या भाज्या वेगवेगळ्या परतायच्या. बटाट्याचे तुकडे करायचे आणि ते ही परतून घ्या. सगळ्या भाज्या खमंग परतायच्या. चिंचेचा कोळ तयार करायचा. 

२. नंतर त्यातच दोन चमचे बेसन घाला आणि बेसन मस्त परतून घ्या. बेसनाचा रंग बदलल्यावर त्यात कडीपत्ता घाला थोडे मेथी दाणे घाला, तसेच मोहरी घाला आणि जिरेही घाला. सुकी लाल मिरची तुकडे करुन घाला. छान परतून घ्या. मग त्यात पाणी ओता जरा उकळी आली की त्यात सगळ्या भाज्या घाला आणि टोमॅटोचे तुकडे करुन त्यात घाला आणि उकळी येऊ द्या. शेवटी चवीनुसार मीठ घाला थोडी हळद घाला आणि लाल तिखट घालून ढवळून घ्यायचे, त्यात चिंचेचा कोळ घालायचा. 

३. झाकण ठेवा आणि एक वाफ काढा. नंतर गरजेनुसार पाणी घाला कढी जरा गडद रंगाची होते. गरमागरम कढी आणि भात खा. भाज्यांची चवही वेगळी लागते आणि नेहमीच्या कढीपेक्षा वेगळी रेसिपी आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhi Kadhi Recipe: A Delicious, Nutritious, and Traditional Dish with Rice

Web Summary : Sindhi Kadhi is a unique, flavorful dish made without yogurt, using besan and tamarind for a tangy taste. Vegetables are fried separately before adding them to the kadhi. Served hot with rice, it's a must-try recipe.
टॅग्स :अन्नपाककृतीभारतीय खाद्यसंस्कृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स