Join us

मुगाचे पौष्टिक सूप-वाढवते ताकद आणि वजनही करते कमी! भरपूर पोषण-चवही लाजबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2025 18:46 IST

Nutritious mung soup - increases strength and also reduces weight! : आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरेल हे सूप. आहारात असायलाच हवे. करायला अगदी सोपे.

पौष्टिक पदार्थ जर चविष्ट असतील तर मग चांगला आहार घेणे सोपे जाते. (Nutritious mung soup - increases strength and also reduces weight! )वजन कमी करण्यासाठी मुगाचे हे सूप अगदीच फायद्याचे ठरेल. अगदी सोपी रेसिपी आहे. मात्र पोषणसत्वांनी परिपूर्ण आहे.    

साहित्यहिरवे मूग, तेल, मीठ, तमालपत्र, वेलची, लसूण, हिरवी मिरची, कांदा, हिंग, पाणी, आलं, कोथिंबीर, दालचिनी, लिंबू, जिरं  

कृती१. रात्रभर मूग भिजत ठेवा. सकाळी त्याचे पाणी काढून घ्या. शिजवताना नवे पाणी वापरा. 

२. एका कुकरमध्ये चमचाभर तेल घ्या. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घाला. (Nutritious mung soup - increases strength and also reduces weight! )तसेच हिरवी मिरची बारीक चिरुन घाला. चमचाभर हिंग घाला. वेलची घाला. तमालपत्र घाला. सगळे मसाले छान परतून घ्या. मग त्यात चिरलेला कांदा घाला. बारीक चिरला नाही तरी हरकत नाही. जरा लांब-लांब काप करुन घ्या. 

३. कांदा छान गुलाबी परतून घ्या. मग त्यामध्ये मीठ घाला. भिजवलेले मूग शेवटी घाला. जरा परतून घ्या. मग त्यामध्ये पाणी घाला आणि कुकर लावा. मस्त चार ते पाच शिट्या काढून घ्या. जरा जास्त शिट्या काढा म्हणजे मूग छान मऊ होतील.

४. कुकर झाल्यावर झाकण उघडायची घाई करु नका. वाफेवर मूग मस्त मऊ होतील. कुकर उघडल्यावर मिश्रण जरा गार होऊ द्या. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओता आणि मस्त पातळ वाटून घ्या. 

५. एका खोलगट पातेल्यामध्ये फोडणी करायची. त्यासाठी पातेल्यात थोडे तेल घाला आणि तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घाला. जिरं फुलल्यावर त्यात हिंग घाला. मग केलेले मिश्रण त्यात ओता आणि गरजेनुसार पाणी घाला. छान एकजीव करा. उकळी येऊ द्या. 

६. सूप मस्त उकळल्यावर त्यात लिंबाचा रस पिळा. अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मग सुपाचा आस्वाद घ्या. तेलाऐवजी तूपही घेऊ शकता. तुपामुळे सूप आणखी पौष्टिक होईल.  

टॅग्स :आहार योजनाअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.