Lokmat Sakhi >Food > पौष्टिक आणि चमचमीत भेसळीचे वरण, मिश्र डाळींचे वरण प्याल वाटी वाटी अशी मस्त चव

पौष्टिक आणि चमचमीत भेसळीचे वरण, मिश्र डाळींचे वरण प्याल वाटी वाटी अशी मस्त चव

Nutritious and delicious daal recipe, must have with rice, good for health, tasty food : एकदा अशी डाळ नक्की करा. पौष्टिक आणि चविष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2025 08:50 IST2025-09-04T08:45:39+5:302025-09-04T08:50:01+5:30

Nutritious and delicious daal recipe, must have with rice, good for health, tasty food : एकदा अशी डाळ नक्की करा. पौष्टिक आणि चविष्ट.

Nutritious and delicious daal recipe, must have with rice, good for health, tasty food | पौष्टिक आणि चमचमीत भेसळीचे वरण, मिश्र डाळींचे वरण प्याल वाटी वाटी अशी मस्त चव

पौष्टिक आणि चमचमीत भेसळीचे वरण, मिश्र डाळींचे वरण प्याल वाटी वाटी अशी मस्त चव

मिश्र डाळींचे वरण किंवा आमटी फार पौष्टिक असते. त्याचबरोबर चवीलाही एकदम छान असते. एकदा नक्की करुन पाहा. (Nutritious and delicious daal recipe, must have with rice, good for health, tasty food  )जेवणात ही डाळ सोबत गरमागरम भात, त्यावर थोडे तूप आणि तोंडी लावायला लोणचं असेल तर आणखी काहीच नको. एखादा भाजलेला पापड जेवणाची रंगत नक्की वाढवेल.  

साहित्य 
तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ, कांदा, लसूण, जिरं, मोहरी, टोमॅटो, मीठ, गरम मसाला, लाल तिखट, हळद, तूप, लिंबू, कसूरी मेथी, कोथिंबीर, हिंग, कडीपत्ता, हिरवी मिरची

कृती
१. सर्व डाळी समप्रमाणात घ्या. जर तूरडाळ अर्धी वाटी घेतली तर मूगडळही अर्धी वाटी घ्या आणि मसूरडाळ ही अर्धी वाटीच घ्या. सगळ्या डाळी स्वच्छ धुवा आणि थोडावेळ भिजत घाला. कोथिंबीर निवडून घ्या आणि मग बारीक चिरुन घ्या. कांद्याची सालं सोला आणि कांदा बारीक चिरुन घ्या. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या. लसूण ठेचून घ्या. टोमॅटो चिरुन घ्यायचा. 

२. डाळींचे पाणी काढून टाका आणि डाळी कुकरमध्ये शिजवून घ्या. नेहमीपेक्षा जास्त  शिट्या काढा म्हणजे सर्व डाळी समान शिजतील. डाळ शिजत लावताना त्यात थोडी हळद आणि थोडे मीठ घाला. तसेच चमचाभर हिंग घालायचे म्हणजे डाळ बाधत नाही. लवकर पचते.

३. एका कढईत चमचाभर तूप घ्या. तूप गरम झाल्यावर त्यात चमचाभर मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरं घाला आणि थोडा कडीपत्ताही घाला. छान परतून घ्या. त्यात लसणाच्या पाकळ्या घाला. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. परतून घ्या आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. कोथिंबीरही परता. परतलेल्या कोथिंबीरीची चव वेगळी लागते. टोमॅटो घाला. कांदा घाला आणि छान परतून घ्या. फोडणी मस्त वास सुटल्यावर त्यात थोडे पाणी घाला. 

४. शिजवलेली डाळ घाला आणि ढवळून घ्या. चमचाभर तिखट घाला, चवी पुरते मीठ घाला. हळद घाला आणि छान उकळी येऊ द्या. त्यात थोडा लिंबाचा रस घाला. सगळ्यात शेवटी थोडी कसूरी मेथी हातावर मळून घाला. जास्त नको अगदी थोडी. मग एक उकळी येऊ द्या. मस्त अशी डाळ गरमागरम भातासोबत खा. 

Web Title: Nutritious and delicious daal recipe, must have with rice, good for health, tasty food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.