Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > सुंठीचा ठसका करतो झटपट वजन कमी! तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी ताज्या आल्यापेक्षा सुंठीचा उपयोग जास्त फायद्याचा

सुंठीचा ठसका करतो झटपट वजन कमी! तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी ताज्या आल्यापेक्षा सुंठीचा उपयोग जास्त फायद्याचा

Dried Ginger Benefits : न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी इन्स्टाग्राम हॅंडलवर व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर ताज्या आल्यापेक्षा वाळलेलं आलं म्हणजेच सुंठ अधिक फायदेशीर असतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:31 IST2026-01-22T13:18:18+5:302026-01-22T13:31:09+5:30

Dried Ginger Benefits : न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी इन्स्टाग्राम हॅंडलवर व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर ताज्या आल्यापेक्षा वाळलेलं आलं म्हणजेच सुंठ अधिक फायदेशीर असतं.

Nutritionist shares what happens when you drink saunth water daily | सुंठीचा ठसका करतो झटपट वजन कमी! तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी ताज्या आल्यापेक्षा सुंठीचा उपयोग जास्त फायद्याचा

सुंठीचा ठसका करतो झटपट वजन कमी! तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी ताज्या आल्यापेक्षा सुंठीचा उपयोग जास्त फायद्याचा

Dried Ginger Benefits : आलं आपल्या किचनमध्ये मिळणारा एक कॉमन मसाला आहे. चहापासून ते वेगवेगळ्या भाज्या आणि पदार्थांमध्ये आलं घातलं जातं. ज्यामुळे भाज्या-पदार्थांची टेस्ट भलतीच वाढते. जास्तीत जास्त घरांमध्ये सामान्यपणे ताज्या आल्याचा वापर केला जातो. पण, प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी इन्स्टाग्राम हॅंडलवर व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर ताज्या आल्यापेक्षा वाळलेलं आलं म्हणजेच सुंठ अधिक फायदेशीर असतं. लीना महाजन यांनी याचे फायदे आणि वापरण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.

कसं फायदेशीर ठरतं सुंठ?

वजन आणि मेटाबॉलिज्मवर प्रभाव

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, सुंठ घालून केलेल्या हर्बल टी ने शरीरातील ९० ते ११० कॅलरी जास्त बर्न होतात. त्याशिवाय सकाळी सुंठाचं सेवन केल्यास शरीराची फॅट बर्न करण्याची क्षमता साधारण १० टक्क्यांनी वाढू शकते. म्हणजे जर काही आठवडे नियमितपणे सुंठाचं सेवन केलं तर आपलं वजन सरासरी १ ते १.५ किलोपर्यंत कमी होऊ शकतं. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांसाठी सुंठ खूप फायदेशीर ठरतं.

मायग्रेन आणि मळमळ होईल दूर

सुंठाने केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर मायग्रेनचं दुखणं आणि मळमळ दूर होण्यासही मदत मिळते. मायग्रेनसंबंधी अभ्यासातून समोर आलं आहे की, आल्याने वेदनेची तीव्रा आणि उलटीसारखी समस्या कमी होते. हलक्या मायग्रेनमध्ये याचा प्रभाव एखाद्या पेनकिलर इतकाच होतो.

सुंठ जास्त फायदेशीर कसं?

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, जेव्हा आलं वाळवलं जातं, तेव्हा त्यातील जिंजरॉल्स नावाचं तत्व शोगॉल्समध्ये रूपांतरीत होतं. शोगॉल्समध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. याने शरीरात तापमान वाढून कॅलरी अधिक बर्न होतात. याने ब्राउन फॅच अॅक्टिव होतं, जे शरीरातील चरबी जाळण्यास मदत करतं. यामुळे ताज्या आल्यापेक्षा सुंठ अधिक फायदेशीर ठरतं.

कसा कराल वापर?

न्यूट्रिशनिस्टनुसार, अर्धा ते एक चमचा सुंठ पावडर एक कप गरम पाण्यात घालून पिणं फायदेशीर ठरेल. हे खास ड्रिंक आपण सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास अधिक फायदा मिळेल.


कुणी घ्यावी काळजी?

अनेक फायदे असूनही सुंठ खाण्याचे काही लोकांना नुकसानही होऊ शकतात. ज्या लोकांना पोटात अल्सर आहे, ज्यांनी गॉलस्टोनची समस्या आहे किंवा जे लोक रक्त पातळ करण्याची औषधं घेत आहेत त्यांनी सुंठ खाऊ नये. तसेच गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुंठाचा वापर करू नये.

Web Title : वजन घटाने के लिए ताज़ी अदरक से ज़्यादा फायदेमंद है सोंठ।

Web Summary : सूखी अदरक, या 'सोंठ', वजन घटाने के लिए ताज़ी अदरक से ज़्यादा असरदार है। यह मेटाबॉलिज्म बढ़ाता है, ज़्यादा कैलोरी जलाता है और माइग्रेन के दर्द को कम करने में मदद करता है। पोषण विशेषज्ञ लीमा महाजन सुबह खाली पेट गुनगुने पानी में आधा चम्मच लेने की सलाह देती हैं। हालांकि, अल्सर, पित्ताशय की पथरी या खून पतला करने वाली दवा लेने वालों को इससे बचना चाहिए।

Web Title : Dried ginger more beneficial than fresh ginger for weight loss.

Web Summary : Dried ginger, or 'sunth,' is more effective for weight loss than fresh ginger. It boosts metabolism, burns more calories, and helps reduce migraine pain. Nutritionist Leema Mahajan suggests consuming half a teaspoon in warm water on an empty stomach for best results. However, those with ulcers, gallstones, or on blood thinners should avoid it.