Join us

फळं खावी की प्यावा फळांचा रस, पाहा तब्येतीसाठी ज्यूस पिणं फांयद्याचं असतं का, तज्ज्ञांचा खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:59 IST

Fruit Juice Vs Fruits : लोक अनेकदा फळांच्या ऐवजी ज्यूस पिणे सुरू करतात. त्यांना वाटते की फळांचा ज्यूस शरीरासाठी अधिक फायदेशीर असतो. पण तथ्य वेगळंच...

Fruit Juice Vs Fruits : फळ आहाराचा एक महत्त्वाचा भाग असावा. कारण फळांमधून शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मिळतात. मात्र नेहमी संपूर्ण फळ खाण्याचा सल्ला दिला जातो, खासकरून हंगामी फळे खाणे आवश्यक असते. पण लोक अनेकदा फळांच्या ऐवजी ज्यूस पिणे सुरू करतात. त्यांना वाटते की फळांचा ज्यूस शरीरासाठी अधिक फायदेशीर असतो. परंतु न्यूट्रिशनिस्ट यांच्या मते फळांचा ज्यूस आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. तो म्हणजे फक्त गोड साखरेचे पाणी!

फळांचा ज्यूस का घातक आहे?

आलिया भट्टपासून ते अनन्या पांडेपर्यंत अनेक सेलिब्रिटींचे न्यूट्रिशनिस्ट सिद्धांत भार्गव यांच्या म्हणण्यानुसार, फळं ज्यूसपेक्षा खूपच जास्त आरोग्यदायी असतात. फळांमध्ये फायबर, पोषक आणि खनिजे असतात आणि ते खाल्ल्याने शरीरात साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. पण फळांचा ज्यूस म्हणजे फक्त रंगीत गोड पाणी असतं. त्यामध्ये फायबर जवळजवळ नसतं, त्यामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढते.

फळांतील फायबर का उपयुक्त आहे?

फळांमधील फायबर फळांतील साखर थेट रक्तात शोषली जाण्यापासून थांबवते, ज्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित राहते आणि शरीर निरोगी राहते. पण जेव्हा फळांचा ज्यूस काढला जातो, तेव्हा त्यातील फायबर वेगळे होते. याशिवाय, ज्यूस तयार करताना निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे नष्ट होतात आणि शेवटी उरते ते फक्त गोड पाणी. त्यामुळे पुढच्या वेळी ज्यूस पिण्याऐवजी बाजारातून ताजी फळं आणा आणि संपूर्ण खा.

पॅकेटमधील ज्यूसही घातक

न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस एक्सपर्ट रिद्धि खन्ना यांनीही सांगितलं की, फळं आणि त्यांचा ज्यूस दोन्हींचे आपापले फायदे आहेत. मात्र, थेट फळं खाणं अधिक फायदेशीर ठरतं. 

ज्यूसमध्ये कमी पॉवर

फळांमध्ये फायबर तर भरपूर मिळतंच, सोबतच यातून अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्सही मिळतात. ही सगळी तत्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यांनी वेगवेगळ्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. दुसरीकडे ज्यूसमध्ये हे पोषक तत्व असतात, पण कमी असतात. फायबर यातून जवळपास निघून जातं.

वजन कमी करण्यासाठी फळं जास्त फायदेशीर

एक्सपर्टनी सांगितलं की, फळांच्या ज्यूसच्या तुलनेत वजन कमी करण्यासाठी थेट फळं खाणं जास्त फायदेशीर ठरतं. फळं खाल्ल्यानं पोट जास्त वेळ भरून राहतं आणि त्यामुळे आपण जास्त काही खात नाही. तेच ज्यूस प्यायल्यानं कॅलरी इनटेक जास्त होतं आणि वजन वाढण्याचा धोकाही वाढतो.

पॅकेटमधील ज्यूस घातक

पॅकेटमधील ज्यूस आजकाल भरपूर लोक पितात. तर याबाबत एक्सपर्टनी सांगितलं की, बाजारात मिळणाऱ्या ज्यूसमध्ये शुगरचं प्रमाण अधिक असतं. हे ज्यूस जास्त काळ टिकून रहावे म्हणून यात नुकसानकारक प्रिजर्वेटिव्स टाकलेले असतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. त्यामुळे पॅकेटमधील ज्यूस टाळणं बरं.

English
हिंदी सारांश
Web Title : Fruit Juice vs. Whole Fruit: Which is Healthier, Experts Weigh In

Web Summary : Experts say whole fruits are healthier than juices. Juices lack fiber, causing blood sugar spikes, while whole fruits offer fiber, vitamins, and minerals beneficial for overall health and weight management. Avoid packaged juices due to high sugar and preservatives.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य