Lokmat Sakhi >Food > आता वर्षभर साठवून ठेवा कैरी, ३ सोप्या पारंपरिक पद्धती- न वाळवता कैरी राहिल मस्त डबाबंद

आता वर्षभर साठवून ठेवा कैरी, ३ सोप्या पारंपरिक पद्धती- न वाळवता कैरी राहिल मस्त डबाबंद

Now store Row Mango all year round, 3 simple traditional methods : कैरीचा किस साठवून ठेवण्यासाठी अगदी सोप्या पद्धती. आमटीत, भाजीत थोडा किस घाला, चव लागेल मस्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2025 12:51 IST2025-05-28T12:50:17+5:302025-05-28T12:51:43+5:30

Now store Row Mango all year round, 3 simple traditional methods : कैरीचा किस साठवून ठेवण्यासाठी अगदी सोप्या पद्धती. आमटीत, भाजीत थोडा किस घाला, चव लागेल मस्त.

Now store Row Mango all year round, 3 simple traditional methods | आता वर्षभर साठवून ठेवा कैरी, ३ सोप्या पारंपरिक पद्धती- न वाळवता कैरी राहिल मस्त डबाबंद

आता वर्षभर साठवून ठेवा कैरी, ३ सोप्या पारंपरिक पद्धती- न वाळवता कैरी राहिल मस्त डबाबंद

भाजी करताना तसेच आमटी करताना त्याला एक विशिष्ट चव यावी यासाठी त्यात वेगवेगळ्या चवींचे पदार्थ आपण घालतो. (Now store Row Mango all year round, 3 simple traditional methods )आंबट, गोड, तिखट सगळ्याच पदार्थांचा त्यासाठी वापर केला जातो. मात्र काही ठराविक पदार्थ आहेत जे ठराविक रेसिपींमध्येच वापरले जातात. जसे की चिंचेचा कोळ. काही जण आमटीमध्ये आंबटपणासाठी चिंचेचा कोळ घालतात. तर काही जणांना आमसूल आवडते.

लिंबाचा रस चवीसाठी विविध पदार्थांत वापरला जातो. आंबटपणासाठी असे काही पदार्थ चटणीतही घातले जातात. चटणीला खास आंबटपणा येतो तो कैरीमुळे. कैरीचा थोडा गर चटणीत घालायचा चटणी अगदी मस्त होते. (Now store Row Mango all year round, 3 simple traditional methods )तसेच हा कैरी गर आमटीतही घातला जातो. इतरही काही पदार्थांची चव वाढवण्याचे काम हा कैरी करते. मात्र फक्त एप्रिल - मे महिन्यात असे आंबट-चिंबट पदार्थ खाता येतात. कैरी तर वर्षभर मिळत नाही. मात्र कैरी वर्षभर साठवता येते हे तुम्हाला माहिती आहे का? या तीन पद्धतींचा वापर करुन कैरी साठवता येते. 

१. कैरी सोलून घ्यायची. सोलून झाल्यावर छान किसून घ्यायची. त्याला थोडे मीठ लावायचे. मीठ लावल्यावर वाळवायची गरज नाही. मात्र हवाबंद डब्यात ठेवायची. अधूनमधून त्याला थोडे मीठ लावत राहायचे. भरपूर कैरी साठवायची असेल तर सम प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये कैरीचा किस ठेवायचा. एकाच डब्यात भरपूर ठेवला तर खराब होतो. असा किस किमान ४ महिने तरी चांगला राहतो. 

२.  सहा ते सात महिने कैरीचा किस टिकवायचा असेल तर त्यासाठी कैरी सोलून घ्यायची. चिरुन घ्यायची त्याला मीठ लावायचे आणि थोडे व्हिनेगर लावायचे. काही तासांसाठी फोडी सुकवायच्या. जरा सुक्या झाल्यावर एअरटाइट बॅगमध्ये ठेवायच्या. 

३. कैरीची आंबोशी करुन साठवायची पद्धत तर घरोघरी वापरली जातेच. कैरीच्या पातळ फोडी करायच्या आणि उन्हामध्ये किमान चार ते पाच दिवस वाळवायच्या. अशी सुकवलेली कैरी आमचूर करण्यासाठी वापरतात. ती वर्षभर आरामात टिकते. 
  

Web Title: Now store Row Mango all year round, 3 simple traditional methods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.