हॉटेलपेक्षा मस्त मिक्स व्हेज आता घरीच करा. अगदी सोपी रेसिपी आहे. चवीला अगदी लाजबाब. (Now make Dhaba style mixed veg at home, satisfy your tongue with joy, easy recipe , healthy and tasty )विकतच्या भाजीची चव विसराल आणि घरीच कराल.
साहित्य
कांदा, काश्मीरी लाल मिरची, तमालपत्र, दालचिनी, काळीमिरी, वेलची, धणे, जिरे, तेल, टोमॅटो, लसूण, गाजर, बटाटा, फरसबी, मीठ, पाणी, हळद, लाल तिखट, पनीर, कोथिंबीर, आलं, मटार, हिरवी मिरची, गरम मसाला, साय
कृती
१. कांदा सोलून घ्यायचा. त्याचे मधे दोन तुकडे करायचे. बटाटा सोलून घ्यायचा. त्याचे तुकडे करायचे. गाजर सोलून घ्यायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. मटार सोलायचे आणि मटार शिजवून घ्यायचे. पनीरचे मोठे काप करायचे. टोमॅटोचे दोन तुकडे करायचे.
२. एका कुकरमध्ये पाणी घ्यायचे. त्यात बटाट्याचे तुकडे घालायचे. गाजर घालायचे. तसेच फरसबी घालायची. त्यात थोडे मीठ घालायचे. सगळे पदार्थ छान ढवळायचे आणि कुकर लावायचा. झाकण बंद करायचे आणि भाज्या मस्त शिजवायच्या. भाजी मऊ होऊ द्यायच्या नाही. जास्त मऊ झाली तर तुकडे नीट राहत नाहीत.
३. कढईत थोडे तेल घ्यायचे. तेल गरम करायचे आणि मग त्यात जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की त्यात कांदा घालायचा आणि टोमॅटो घालायचा. तसेच लसणाच्या पाकळ्या आणि आलं घालायचे. काजू घालायचे. लाल मिरची घालायची. थोडे धणे घाला आणि मग सगळं छान परतून घ्या. परतून झाल्यावर गार होऊ द्यायचे. गार झाल्यावर मिक्सरमधून फिरवायचे. पेस्ट घट्ट चालेल. त्यात पाणी नका घालू. शिजवलेल्या भाज्या काढून घ्यायच्या. त्याचे तुकडे करायचे.
४. कढईत थोडे तेल घ्यायचे. तेलावर बारीक चिरलेली लसूण परतायची. मग त्यात थोडे जिरे घाला आणि ते फुलल्यावर तमालपत्राचे पान घाला. काळीमिरी घाला तसेच दालचिनी घालायची. मसाले छान परतायचे. त्यात हिरवी मिरची घालायची. लांब लांब काप केलेली मिरची घालायची. सगळं छान परता मग त्यात चिरलेल्या भाज्या घालायच्या. भाज्या जरा परतून घ्या. गरम मसाला घाला आणि मग तयार केलेली पेस्ट त्यात घाला. पेस्ट छान परतून घ्या. त्यात ताजी साय घाला. झाकून एक वाफ काढा. मस्त गरमागरम खा.