Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता घरीच करा कोबी मंचुरिअन- खा पोटर इंडियन चायनिजची! विकतचं लालेलाल चायनिज टाळा, बिघडतेय तब्येत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2026 13:31 IST

Now make Cabbage Manchurian at home - never eat outside food try homemade : चविष्ट असे मंच्युरियन करा घरीच. पाहा रेसिपी.

लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनाही मंच्यूरियन खायची इच्छा टाळता येत नाही. २० रुपयात आरामात पोटभर खाता येतात मात्र त्याचा दर्जा आणि त्यात वापरलेले सॉस चांगल्या दर्जाचे नसतात त्यामुळे मंच्यूरियन जास्त प्रमाणात बाधते. (Now make Cabbage Manchurian at home - never eat outside food try homemade )विकतपेक्षा भारी मंच्यूरियन घरीच करा. हवे तेवढे खा. अजिबात बाधणार नाहीत. पाहा सोपी रेसिपी. 

साहित्य कोबी, कांदा, आले, लसूण, पातीचा कांदा, मैदा, कॉर्नफ्लावर, काळीमिरी पूड, लाल तिखट, मीठ, सोया सॉस, कोथिंबीर, हिरवी मिरची, तेल , शेजवान सॉस 

कृती१. कोबी चांगला ताजा आणि स्वच्छ घ्यायचा. त्याची पानं काढायची आणि आतला पांढरट भाग किसून घ्यायचा. त्याला पाणी सुटते. खुपच जास्त पाणी सुटलं तर ते बाजूला करा आणि नंतर पीठ मळताना वापरा. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. पातीचा कांदाही स्वच्छ करायचा आणि बारीक चिरुन घ्यायचा. 

२. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आणि त्यात आल्याचा तुकडा घालायचा, त्याची पेस्ट करुन घ्यायची. कोथिंबीर निवडायची आणि बारीक चिरायची. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. एका परातीत कोबी घ्यायचा. त्यात कांदा घालायचा. तसेच पातीचा कांदाही घालायचा. त्यात कोथिंबीर घाला आणि आले - लसूण पेस्ट घालून कालवून घ्या. 

३. त्यात गरजेनुसार मैदा घाला आणि दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर घालायचा. काळीमीरी पूड घालायची. तसेच चवीनुसार मीठ घालायचे. थोडा सोया सॉस, शेजवान सॉस, लाल तिखट आणि थोडं कोमट तेल घालायचं. सगळं मस्त कालवायचं. त्याचं सैलसर पीठ मळायचं. जास्त घट्ट नको. पातळच मळा. त्याचं जास्तीचं पाणी काढा आणि पाच मिनिटे मुरु द्या. 

४. तेल गरम करा. मस्त उकळत्या तेलात गोल करुन सोडायचे. मस्त खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. रंग बदलून गडद होतो तोपर्यंत तळायचे. एकदम मस्त होतात. काढून घेतल्यावर जरा गार करायचे आणि त्यावर शेजवान चटणी घाला. मस्त लागतात.  

English
हिंदी सारांश
Web Title : Make Cabbage Manchurian at Home: A Healthy, Tasty Alternative.

Web Summary : Avoid unhealthy street food! Prepare delicious cabbage Manchurian at home using fresh ingredients. This easy recipe ensures a safe, tasty, and satisfying meal for everyone. Enjoy homemade goodness!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स