आपल्या बाल्कनीमध्ये आपण अनेक रोपे लावतो. तुळस तर असतेच. एखादे फुल झाड असते. कडीपत्ता असतो. काही जण मिरची लावतात तर काही कोथिंबीर. (Now drink tea and lose weight.. see the recipe.. as well as other amazing benefits)अजून एक रोप असतं ते म्हणजे गवती चाहा. चहामध्ये टाकण्यासाठी त्याचा वापर आपण करतो. मात्र चहाची चव वाढवण्यासाठीच त्याचा वापर केला जातो असे नाही. गवती चहामध्ये अनेक गुणधर्म असतात. शरीरासाठी तो फारच पौष्टिक असतो. तुम्हीही जर बाल्कनीमध्ये गवती चहा लावला असेल तर त्याचा वापर वाढवा. लावला नसेल तर नक्की लावा. फार काळजी घ्यावी लागत नाही. (Now drink tea and lose weight.. see the recipe.. as well as other amazing benefits)जर रोपेच लावली नसतील तर अगदीच शुल्लक किंमतीमध्ये मंडईमध्ये विकत मिळेल घेऊन या आणि वापरा.
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर मग गवती चहाचा वापर करायला सुरवात करा. मेडीकलन्यूज तसेच हेल्थलाईनसारख्या साईट्सवर माहिती उपलब्ध आहे. प्रचंड साखर घातलेल्या चहामध्ये गवती चहा घातल्याने त्याचे काहीही फायदे मिळणार नाहीत. त्याचा वेगळा स्पेशल चहा तयार करता येतो.
साहित्य
गवती चहा, लिंबू, आलं, मध, दालचिनी, लवंग, चहा पूड
कृती
१. एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवा. त्यामध्ये गवती चहाच्या ४ ते ५ पाती घाला. आलं किसून घाला. दोन लवंग घाला. दालचिनीचा तुकडा घाला. अगदी अर्धा चमचा चहा पूड घाला. छान उकळवा.
२. एका कपमध्ये लिंबाचा रस पिळून घ्या. त्यामध्ये हा चहा गाळा. त्यामध्ये चमचाभर मध घाला. आणि रोज सकाळी असा चहा प्या.
गवती चहाचे फायदे
१. गवती चहा पचनासाठी फार चांगला असतो. अपचनाचा त्रास जर असेल, तर तो अगदी गायब करण्याची क्षमता गवती चहामध्ये असते.
२. पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठीही गवती चहा फायदेशीर ठरतो.
३. त्वचेसाठी गवती चहा फार चांगला असतो. म्हणूनच त्यापासून तयार केलेले स्कीन प्रॉडक्ट बाजारात सध्या ट्रेंडींग आहेत.
४. जर सारखा सर्दी खोकला होत असेल तर गवती चहाचा वापर करणे फायदेशीर ठरेल.