Join us

कुरमुऱ्याचा ‘असा’ चिवडा करा, चमचमीत चिवडा खाल्ला पोटभर तरी वजन वाढण्याचं नो टेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2025 08:50 IST

no tension of gaining weight, try this Chivda recipe : हा कुरमुऱ्याचा चिवडा अगदी झटपट होतो. चवीला अगदीच मस्त.

जेवणानंतर चहाबरोबर किंवा काम करताना काही तरी चघळायची अनेकांना सवय असते. वेफर्स असतील किंवा मग इतर काही स्नॅक्स असतील. सतत खाण्याची सवय लागली असते. ( no tension of gaining weight, try this Chivda recipe )मात्र सतत तेलकट तळलेले पदार्थ खाणे चांगले नाही. विकतचे असे पदार्थ तर नाहीच. ऑफीसमध्येही मधल्या वेळेत किंवा टी ब्रेक असताना काही तरी छान खावेसे वाटते. स्नॅक्सचे पदार्थ ज्याला भारतात टाईमपास असे ही म्हटले जाते. ते पदार्थ घरीही करता येतात. घरी केल्यावर ते पौष्टिकही होतात आणि चविष्टही होतात.

आपल्याकडे अनेक प्रकारचा चिवडा केला जातो. घरोघरी चिवड्याचे डबे भरलेले असतात. ( no tension of gaining weight, try this Chivda recipe )असाच एक मस्त कुरकुरीत प्रकार म्हणजे कुरमुर्‍यांचा चिवडा. कुरमुरे म्हणा किंवा मुरमुरे म्हणा. इतरही ठिकाणी वेगळ्या नावाने हा पदार्थ ओळखला जातो. वजन कमी करण्यासाठी कुरमुरे अगदी मस्त पर्याय आहे. पचायला अगदी हलका असा हा पदार्थ आहे. पण त्याला काही खास चव नाही. मात्र विविध पदार्थ घालून केलेला कुरमुर्‍यांचा चिवडा अगदी चविष्ट लागतो. 

साहित्य कुरमुरे, शेंगदाणे, तेल, कडीपत्ता, मोहरी, सुके खोबरे, जिरे, मीठ,हळद, लाल तिखट

कृती१. एका कढईमध्ये तेल घ्या. त्यात शेंगदाणे परतून घ्या. शेंगदाणे छान परतल्यावर त्यात सुक्या खोबऱ्याचे पातळ काप घालायचे आणि छान परतून घ्यायचे. शेंगदाणे व खोबरं परतून झाल्यावर एका ताटात काढून ठेवा. त्याच कढईत थोडे आणखी तेल घ्या तेल तापल्यावर त्यात जिरे घाला तसेच भरपूर मोहरी घाला.

२. कडीपत्त्याची पाने फोडणीला वापरता तेवढी नाही तर भरपूर वापरायची. कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत परतायचा. मग त्यात हळद घाला आणि मीठ घाला. त्यात कुरमुरे घाला आणि छान ढवळून घ्या. कुरमुळे कुरकुरीत झाल्यावर त्यात परतलेले शेंगदाणे घाला तसेच सुके खोबरेही घाला. लाल तिखट घाला आणि मस्त मिक्स करुन घ्या. चिवडा जरा खमंग परतला की गॅस बंद करा आणि हवाबंद डब्यात चिवडा साठवून ठेवा.            

अगदी झटपट हा चिवडा होतो. त्यासाठी सामग्रीही मोजकीच वापरली तरी चालते. तसेच तुम्हाला सुकामेवा लसूण असे पदार्थ आवडत असतील तर ते ही घालू  शकता. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स