घरच्या घरी चॉकलेट करायचे म्हटले की अनेकांना वाटते की त्यासाठी ओव्हन, खास साचे किंवा खूप साखर लागतेच. पण प्रत्यक्षात फक्त फ्रिज वापरुनही मस्त चॉकलेट तयार करता येते, तेही अगदी सोप्या पद्धतीने. विशेष म्हणजे साखर न वापरताही करता येते. विविध फळांचे चॉकलेट करता येते त्यापैकीच एक मस्त प्रकार म्हणजे स्ट्रॉबेरी चॉकलेट. जे चवीला छान लागते आणि तुलनेने आरोग्यदायीही ठरते. स्ट्रॉबेरी हे फळ नैसर्गिक गोडी देणारे असते. (No oven, no sugar - delicious strawberry chocolate sets in the fridge, five minutes of work)त्यामुळे चॉकलेटमध्ये वेगळी साखर घालण्याची गरज पडत नाही. स्ट्रॉबेरीची हलकी आंबट-गोड चव आणि चॉकलेटची समृद्ध चव एकत्र आल्यावर एक वेगळाच फ्लेवर तयार होतो. या रेसिपीमध्ये मैद्याऐवजी केळ्याचा वापर करता येतो. फ्रिजमध्ये सेट होणारे चॉकलेट ही आणखी एक सोयीची गोष्ट असते. उष्णतेची गरज नसल्यामुळे चॉकलेट जळण्याचा किंवा खराब होण्याचा संभाव्यता कमी असते. फ्रिजमुळे चॉकलेटला योग्य घट्टपणा येतो आणि त्याचा पोतही छान राहतो. त्यामुळे घरच्या घरी तयार केलेले चॉकलेट दिसायलाही आकर्षक वाटते.
साखर न घातल्यामुळे हे स्ट्रॉबेरी चॉकलेट लहान मुलांसाठी तसेच गोड पदार्थ आवडीने खाणाऱ्यांसाठीही एक चांगला पर्याय ठरतो. यामध्ये नैसर्गिक गोडी असल्याने गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते, पण शरीरावर अनावश्यक साखरेचा ताण येत नाही. वजन नियंत्रणात ठेवणार्यांसाठीही हे चॉकलेट समाधानकारक ठरु शकते.
साहित्य
केळी, कोको पावडर, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, डार्क चॉकलेट
कृती
१. एका मिक्सरच्या भांड्यात केळ्याचे तुकडे घ्यायचे. त्यात डार्क चॉकलेट घालायचे. तसेच थोडी कोको पावडर घालायची आणि त्याची पेस्ट तयार करायची. डार्क चॉकलेट लिक्विड वापरा.
२. एका चौकोनी भांड्याला बेकींग पेपर लावायचा. त्यात स्ट्रॉबेरीचे तुकडे लावायचे. ब्लूबेरीचे तुकडेही लावायचे. नंतर तयार केलेली केळ्याची पेस्ट त्यावर ओतायची. नीट सेट करायची. नंतर फ्रिझरमध्ये ठेवायचे. पूर्ण घट्ट होईपर्यत फ्रिज करायचे. नंतर काढून घ्या आणि त्याचे तुकडे करा.
