कधी भाजी करायचा कंटाळा आला किंवा भातासोबत आमटी - वरण करायचा कंटाळा आला असेल तर करता येतील अशा अनेक रेसिपी आहेत. ज्या काही मिनिटांत होतात आणि चवीलाही कमाल लागतात. अशा काही रेसिपी नक्की करायला हव्यात. घाईगडबडीत असताना किंवा नाश्त्यासाठी कधी काय करायचे सुचत नसेल. (No need to fry or roast, make onion chutney in just 5 minutes, spicy and easy recipe)घरात भाजी नसेल तर एकदा ही कांद्याची चटणी करुन पाहा. भातासोबतही मस्त लागते आणि पोळी - चपातीसोबतही मस्त लागते. एकदा ही रेसिपी नक्की करुन पाहा. एकदा केली की परत नक्की कराल. लहानांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल. अगदी सोपी आहे आणि कमी सामग्रीतही होते.
साहित्य कांदा, लसूण, तेल, मोहरी, हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, धणे - जिरे पूड, जिरे
कृती१. कांदा सोलायचा आणि त्याचे तुकडे करायचे. तसेच ताजी छान कोथिंबीर आणायची आणि निवडून घ्यायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. एका मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे तुकडे घ्यायचे. त्यात लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडेही घ्यायचे. त्यात कोथिंबीर घालायची. चमचाभर धणे - जिरे पूड घालायची. चमचाभर लाल तिखट घालायचे. तसेच चवीपुरते मीठ घालायचे आणि एकजीव वाटून घ्यायचे.
२. ठेचून केली तर चटणी जास्त चविष्ट होते, ठेचून किंवा वाटून करायची नसेल तर मिक्सर वापरा. चटणी छान वाटून घ्यायची. जरा जाडसर वाटायची अगदी जास्त पेस्ट करायची नाही. एका फोडणीपात्रात थोडे तेल घ्यायचे. तेल जरा तापल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. चमचाभर जिरे घालायचे आणि फोडणी छान परतायची. तयार फोडणी चटणीवर ओतायची आणि एकजीव करायची. छान मिक्स करायची.
Web Summary : Whip up this quick and delicious onion chutney in minutes when you're short on time or ingredients. Perfect with rice, roti, or chapati, this simple recipe uses readily available ingredients for a flavorful side dish that everyone will love. It's easy to make and requires minimal effort.
Web Summary : जब समय कम हो या सामग्री न हो तो यह झटपट और स्वादिष्ट प्याज की चटनी मिनटों में बनाएं। चावल, रोटी या चपाती के साथ बिल्कुल सही, यह आसान रेसिपी स्वादिष्ट साइड डिश के लिए आसानी से उपलब्ध सामग्री का उपयोग करती है जो सभी को पसंद आएगी। यह बनाने में आसान है और इसमें कम मेहनत लगती है।