केक करायचा म्हणजे भरपूर वेळ आणि कष्ट असेच वाटते ना? मात्र एकदा हा केक करुन पाहा पुन्हा नक्कीच कराल. अगदी झटपट होतो आणि चवीला भारी लागतो. मैदा न वापरता घरात असलेली कणिक वापरुन करायचा. कणकेचा केक एवढा मस्त लागू शकतो याचा विचारही केला नसेल. (No flour or sugar needed, this wheat flour cake can be made in any pan - ready in 20 minutes)मैदा पोटात फुगतो त्यामुळे कणकेचा केक कधीची जास्त फायद्याचा. तसेच कोणत्याही पातेल्यात शिजवता येतो. शिजायला २० मिनिटे लागतात. त्यामुळे अर्ध्या तासात तयार होणारा पदार्थ आहे. पाहा कसा करायचा.
साहित्य दही, तेल, कणिक, गूळ पूड, कोको पावडर, बेकींग सोडा, बेकींग पावडर, मीठ, दूध, पाणी
कृती१. एका खोलगट पातेल्यात वाटीभर दही घ्यायचे. त्यात वाटीभर गुळाची पूड घालायची. मस्त एकजीव करायचे. छान मिश्रण एकजीव तयार झाले की त्यात चार चमचे तेल घालायचे. थोडा बेकींग सोडा घालायचा. ढवळून घ्यायचे. थोडी कोको पावडर घालायची. छान ढवळून घ्यायचे. ढवळून झाल्यावर त्यात कणिक घालायची. कणीक छान मिक्स करायची.
२. कणिक छान एकजीव करायची, त्यात दूध घालत राहायचे. ढवळत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. त्यात थोडी बेकींग पावडर घालायची. ढवळत राहायचे. मध्यम पातळ असे मिश्रण तयार झाल्यावर त्यात किंचित मीठ घालायचे. तुम्हाला आवडेल त्या भांड्यात केक करा. कपात केला तरी हरकत नाही.
३. भांड्याला थोडं तेल लावा आणि त्यात मिश्रण ओता. गॅसवर खोलगट पातेलं गरम करा त्यात पाणी ओता मधे उलटी ताटली ठेवा. त्यावर डबा ठेवा आणि मस्त शिजवून घ्या. २० मिनिटांत तयार होते, सुरीच्या मदतीने तपासून पाहायचे की केक शिजला आहे की नाही. नंतर गार झाल्यावर खायला घ्यायचा. मस्त लागतो.
Web Summary : Make a quick, delicious wheat flour cake at home without maida or sugar. This recipe uses readily available ingredients and cooks in any pan within 20 minutes. A healthy and tasty alternative for cake lovers, ready in half an hour.
Web Summary : मैदा आणि साखरेशिवाय घरी झटपट, स्वादिष्ट गव्हाच्या पिठाचा केक बनवा. ही रेसिपी सहज उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करते आणि 20 मिनिटांत कोणत्याही भांड्यात शिजते. केक प्रेमींसाठी एक आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय, अर्ध्या तासात तयार.