Join us
Daily Top 2Weekly Top 5

नको डाळ-तांदूळ, नको पीठ आंबवण्याची झंझट! फक्त १५ मिनिटांत करा पांढरीशुभ्र, गुबगुबीत जाळीदार इडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2025 19:00 IST

no fermentation idli batter recipe : how to make instant idli batter without fermentation : how to make fluffy idli without fermentation : इडल्या तयार करण्याची किचकट, वेळखाऊ पद्धत विसरा, फक्त काही मिनिटांत मऊ, लुसलुशीत इडल्या तयार करण्याची इन्स्टंट रेसिपी...

सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचा हलका स्नॅक... मऊ, लुसलुशीत इडली खायला कोणाला आवडत नाही. इडली तयार करायची म्हटलं की डाळ-तांदूळ भिजवणे, वाटणे आणि पीठ आंबण्यासाठी तासन्‌तास वाट पाहणे ही सगळी प्रक्रिया बराच वेळ घेणारी असते. यातही इतकी मेहेनत करूनही पीठ व्यवस्थित फुलून आले नाही किंवा इडल्या दडदडीत - वातड झाल्या तयार सगळाच हिरमोड होतो. इडली खायला तर सगळ्यांना आवडते पण इडली तयार करण्याचा हा मोठा व्याप आठवून अनेकदा इडली तयार करण्याचा बेत रद्द केला जातो(how to make fluffy idli without fermentation).

अचानक पाहुणे आले असतील, सकाळी ऑफिसला घाई असेल किंवा नाश्त्यासाठी झटपट काहीतरी करायचं असेल तर अशावेळी तांदुळाच्या पिठापासून तयार केलेली इन्स्टंट इडली म्हणजे एकदम बेस्ट आणि उत्तम पर्याय...या पद्धतीत तुम्हाला डाळ - तांदूळ भिजवायची गरज नाही, आणि पीठ आंबवण्याची देखील आवश्यकता नाही. फक्त घरात उपलब्ध असलेल्या तांदळाच्या पिठाचा वापर करून, तुम्ही फक्त १० ते १५ मिनिटांत एकदम मऊ आणि चविष्ट इन्स्टंट (no fermentation idli batter recipe) इडली तयार करू शकता. मऊ - लुसलुशीत इडल्या तयार करण्याची किचकट, वेळखाऊ पद्धत विसरा आणि फक्त काही मिनिटांत मऊ, लुसलुशीत आणि सॉफ्ट इडल्या तयार करण्याची ही इन्स्टंट (how to make instant idli batter without fermentation) रेसिपी नक्की करून पाहा...

साहित्य :- 

१. तांदुळाचे पीठ - १ + १/२ कप २. बारीक रवा - १/२ कप  ३. दही - १/२ कप ४. पाणी - गरजेनुसार६. इनो / खाण्याचा सोडा - १/२ टेबलस्पून ७. मीठ - चवीनुसार

पारंपरिक राजस्थानी स्टाईल कच्च्या ओल्या हळदीची भाजी! एकदा खाल्ली तर चव विसरणार नाही, पाहा रेसिपी... 

उरलेल्या ब्रेडचे कुरकुरीत, गरमागरम मेदू वडे! वड्याचे पीठ तयार करण्याची झंझटच विसरा - होईल झक्कास बेत...  

कृती :- 

१. एका मोठ्या बाऊलमध्ये तांदुळाचे पीठ घ्यावे, मग यात बारीक रवा, दही आणि गरजेनुसार पाणी घालावे. २. सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करुन घ्यावे. ३. मग या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ आणि इनो किंवा खाण्याचा सोडा घालावा. ४. सगळे बॅटर चमच्याने कालवून एकजीव करुन घ्यावे, तयार बॅटर झाकून २० ते २५ मिनिटे ठेवून द्यावे. 

५. जर आपल्याला या इडलीच्या बॅटरमध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो घालायचे नसेल तर हे बॅटर रात्री तयार करून, रात्रभर तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी त्याच्या इडल्या तयार कराव्यात. ६. इडली पात्राला थोडेसे तेल लावून त्यात हे तयार बॅटर ओतून घ्यावे. ७. मग नेहमीप्रमाणे इडली पात्रात ठेवून २० ते २५ मिनिटे इडल्या वाफवून घ्याव्यात. 

इडली तयार करण्यासाठी तांदूळ न वाटता, बॅटर न आंबवता देखील आयत्यावेळी बॅटर तयार करून तितकीच मऊ - लुसलुशीत इडली खाण्यासाठी तयार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Instant Idli Recipe: Soft, spongy idlis in 15 minutes, no fermentation!

Web Summary : Skip soaking and grinding! This instant idli recipe uses rice flour, semolina, and yogurt for fluffy idlis in just 15 minutes. Perfect for quick breakfasts or snacks; a no-fermentation method delivers soft results every time.
टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.