गोभी मंचूरियन साध्या मंचूरियनपेक्षा चवीला फार वेगळे असते. घरी करायला अगदीच सोपे आहे. करायला जास्त वेळ लागत नाही. (No cabbage, now make Gobhi Manchurian - a quick and delicious recipe, especially for kids)तसेच चमचमीत आणि एकदम मस्त होते. लहान मुलांसाठी खाऊ म्हणून कधीतरी गोभी मंचूरियन करायला हरकत नाही. पाहा कसे करायचे.
साहित्य
फ्लावर, मीठ, पाणी, मैदा, कॉर्नफ्लावर, आलं, लसूण, लाल तिखट, काळीमिरी पूड, तेल, सिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची, सोया सॉस, रेड चिली सॉस, शेजवान सॉस
कृती
१. फ्लावरचे तुकडे करायचे. मीठ पाण्यात ठेवायचे. तुकडे जास्त लहान नको, मोठेच करायचे. नंतर लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या, आल्याचा लहान तुकडा घ्यायचा. दोन्ही पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या आणि वाटून पेस्ट तयार करायची. सिमला मिरची बारीक चिरुन घ्यायची. कांदा सोलायचा आणि कांदाही छान बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचेही तुकडे करुन घ्यायचे.
२. एका खोलगट भांड्यात मैदा घ्यायचा. त्यात कॉर्नफ्लावर घालायचे. आलं - लसूण पेस्ट घालायची. चमचाभर लाल तिखट घालायचे. काळीमिरी पूड घालायची. चवी पुरते मीठ घालायचे. पाणी घालायचे आणि पेस्ट तयार करायची. घट्ट पेस्ट करायची जास्त पातळ नको. त्यात फ्लावरचे तुकडे घालायचे. त्याला मसाला लावायचा.
३. कढईत तेल गरम करायचे. त्यात फ्लावरचे तुकडे सोडायचे आणि तळून घ्यायचे. मस्त कुरकुरीत करायचे. आत मऊ आणि बाहेर कुरकुरीत होतात.
४. एका पॅनमध्ये तेल घ्यायचे. त्यात बारीक चिरलेला लसूण घालायचा. तसेच हिरव्या मिरीचीचे तुकडे घालायचे. सिमला मिरची घालायची. कांदा घालायचा आणि परतून घ्यायचा. छान परतून घ्यायचे. मग त्यात शेजवान सॉस घालायचा. सोया सॉस घालायचा. रेड चिली सॉस घालायचा. अगदी थोडी कॉर्नप्लावरची पाण्यात तयार केलेली पेस्ट घालायची. ढवळायचे आणि एक उकळी काढून घ्यायची.
५. त्यात तळलेले फ्लावरचे तुकडे घालायचे. मिक्स करायचे. गरमागरम खायचे. चवीला एकदम मस्त असतात. सोया सॉसमध्ये मीठ असते. त्यामुळे मीठाचे प्रमाण त्यानुसार घ्यायचे.
