Lokmat Sakhi >Food > बिना ब्रेडचे सँडविच कधी खाल्ले आहे? चवीला भारी आणि पौष्टिकही, पाहा रेसिपी

बिना ब्रेडचे सँडविच कधी खाल्ले आहे? चवीला भारी आणि पौष्टिकही, पाहा रेसिपी

No Bread sandwich Recipe : बिना ब्रेडचे हेल्दी सॅन्डविच तयार करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2025 19:32 IST2025-01-19T19:29:14+5:302025-01-19T19:32:45+5:30

No Bread sandwich Recipe : बिना ब्रेडचे हेल्दी सॅन्डविच तयार करा.

No Bread Sandwich Recipe | बिना ब्रेडचे सँडविच कधी खाल्ले आहे? चवीला भारी आणि पौष्टिकही, पाहा रेसिपी

बिना ब्रेडचे सँडविच कधी खाल्ले आहे? चवीला भारी आणि पौष्टिकही, पाहा रेसिपी

ब्रेड खाणे शरीरासाठी चांगले नाही. ब्रेडमध्ये असे बरेच पदार्थ असतात जे शरीरासाठी हानिकारक आहेत. (No Bread Sandwich Recipe) पण मग सॅन्डविच तयार करायचे असेल तर काय करणार. सॅन्डविच तयार करताना महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ब्रेड. पण आता बिना ब्रेडचं सॅन्डविच तयार करा. पौष्टिक तर आहेच. पण चविला अगदी लाजवाब आहे.  कृती अगदी सोपी आहे. (No Bread Sandwich Recipe)

साहित्य:
मटार, मिरची, पाणी, चीज, तूप, कांदा, सिमला मिरची, टोस्टर, रवा, कोथिंबीर 

 इतर आवडीच्या भाज्या वापरू शकता. 

कृती :(No Bread Sandwich Recipe)
१. सर्वप्रथम मटारचे छान गोड दाणे एका मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात हिरवी मिरची व कोथिंबीर घाला. पेस्ट करण्यापुरतं पाणी घाला. आता मटारची व्यवस्थित पेस्ट करून घ्या. 

२. मटारच्या पेस्ट मध्ये गरजेनुसार रवा घाला. रव्याचे प्रमाण पेस्टपेक्षा थोडे कमी असू द्या. कारण रवा फुगतो. आत्यात अगदी थोडंस पाणी घाला. तयार पीठ दहा मिनिटांसाठी झाकून बाजुला  ठेवा.

३. एकीकडे कांदा, सिमला मिरची आणि इतर आवडीच्या भाज्या बारीक चिरून घ्या. सर्व भाज्या एकत्र करून ठेवून द्या. त्यात थोडं मीठ घाला.

४. दहा मिनिटांनी तयार पीठात थोडं मीठ घाला. गरज वाटत असेल तर पाणी घाला. अजून थोडावेळ बाजूला ठेवा.

५. एका टोस्टरला तूप लावून घ्या. तूप  निट लावा. नाहीतर बॅटर चिकटेल.(No Bread Sandwich Recipe)

६.आता मटार पेस्टची एक लेअर तयार करा .जास्त पातळ नको. त्यावरती भाज्या ठेवा. चीज किसून घाला. त्यावरती पुन्हा एकदा मटारच्या बॅटरची लेअर घाला. 

७. टोस्टर निट बंद करा. आणि गॅसवर ठेवा.

८. दोन्ही बाजू पाच पाच मिनिटे गॅसवरती ठेवा. सॅन्डविच छान कुरकुरीत होऊ द्या. चिकट खाण्यात मज्जा नाही. दहा मिनिटांनी टोस्टर उघडा. आवडत्या चटण्यांबरोबर किंवा सॉस बरोबर खा.      
 

बॅटर पूर्ण शिजणे महत्त्वाचे आहे. दहा मिनिटांनी जर सॅन्डविच सुटत नसेल तर, अजून थोडावेळ गॅसवरती ठेवा. असे सॅन्डविच पौष्टिक व चविष्ट आहे. लो फॅट आहे.  

Web Title: No Bread Sandwich Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.