Lokmat Sakhi >Food > Kids Lunch Box Recipe : शाळेत खाऊच्या डब्यासाठी करा क्रिमी चॉकलेट सँडविच! झटपट पदार्थ मुलांनाही आवडेल...

Kids Lunch Box Recipe : शाळेत खाऊच्या डब्यासाठी करा क्रिमी चॉकलेट सँडविच! झटपट पदार्थ मुलांनाही आवडेल...

Kids Lunch Box Recipe : No bread double chocolate sandwich : How To Make Chocolate Sandwich At Home : Chocolate Sandwich At Home Recipe : मुलांना डब्यांत खाऊ म्हणून किंवा सकाळचा नाश्ता म्हणून हे चॉकलेट सँडविच उत्तम पर्याय ठरेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 15:12 IST2025-06-17T15:11:23+5:302025-06-17T15:12:07+5:30

Kids Lunch Box Recipe : No bread double chocolate sandwich : How To Make Chocolate Sandwich At Home : Chocolate Sandwich At Home Recipe : मुलांना डब्यांत खाऊ म्हणून किंवा सकाळचा नाश्ता म्हणून हे चॉकलेट सँडविच उत्तम पर्याय ठरेल.

No bread double chocolate sandwich How To Make Chocolate Sandwich At Home Chocolate Sandwich At Home Recipe | Kids Lunch Box Recipe : शाळेत खाऊच्या डब्यासाठी करा क्रिमी चॉकलेट सँडविच! झटपट पदार्थ मुलांनाही आवडेल...

Kids Lunch Box Recipe : शाळेत खाऊच्या डब्यासाठी करा क्रिमी चॉकलेट सँडविच! झटपट पदार्थ मुलांनाही आवडेल...

'चॉकलेट' हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच फार आवडतो. मुलांच्या बाबतीतच सांगायचं झालं तर त्यांना चॉकलेटचे वेगवेगळे प्रकार, पदार्थ कायमच आवडतात. चॉकलेट (No bread double chocolate sandwich) म्हणजे मुलांचा वीक पॉईंट. सध्या मुलांच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या आहेत त्यामुळे मुलांना रोज डब्यांत (How To Make Chocolate Sandwich At Home) नवीन काय द्यावं असा प्रश्न प्रत्येक आईला पडतोच. मुलं डब्यांत (Kids Lunch Box Recipe) आवडीचा पदार्थ असेल तर डबा अगदी चाटून पुसून फस्त करतात. पण तेच पोळी भाजी किंवा त्यांच्या नावडतीचे पदार्थ दिले तर डबा जसाच्यातसाच घरी परत येतो. यासाठीच, मुलं सारखं काहीतरी मस्त, नेहमीपेक्षा वेगळं आणि खायला आवडेल असा खाऊ दे म्हणून हट्ट करतात(Chocolate Sandwich At Home Recipe).

यासाठीच, मुलांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आपण मुलांच्या आवडीचे क्रिमी, चॉकलेटी आणि टेस्टी असे चॉकलेट सँडविच घरच्याघरीच तयार करु शकतो. मुलांना डब्यांत खाऊ म्हणून किंवा सकाळचा नाश्ता म्हणून हे चॉकलेट सँडविच उत्तम पर्याय ठरेल. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात मैदा, साखर किंवा ओव्हनचा वापर न करता चॉकलेट सँडविच कसे तयार करायचे ते पाहा.     

साहित्य :- 

१. गव्हाचे पीठ - ५ ते ६ टेबलस्पून 
२. कोको पावडर - ३ टेबलस्पून 
४. दूध - ३ ते ४ टेबलस्पून 
५. दही - ३ ते ४ टेबलस्पून 
६. तेल - ३ टेबलस्पून 
७. गुळाची पावडर - ३ ते ४ टेबलस्पून 
८. बेकिंग पावडर - १/४ टेबलस्पून 
९. बेकिंग सोडा - १/८ टेबलस्पून 
१०. बटर - १ टेबलस्पून 
११. चॉकलेट स्प्रेड - २ ते ३ टेबलस्पून 

घरात कोणतीच भाजी नाही? मग करा राजस्थानी फेमस 'पापड की सब्जी' - अस्सल झणझणीत पारंपरिक चव...


फणस कापा की बरका? ओळखण्यासाठी फक्त ६ टिप्स, अंदाज चुकणार नाही! गरे खा पोटभर...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, कोको पावडर, दूध, दही असे पदार्थ घालूंन मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. 
२. आता या मिश्रणात तेल, गुळाची पावडर, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालावा. सगळ्यांत शेवटी हे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. 
अशा प्रकारे सँडविचसाठीचे बॅटर तयार करून घ्यावे. 
३. आता एक टोस्टर घेऊन त्यात थोडे बटर सर्वत्र पसरवून लावून घ्यावे, त्यानंतर तयार बॅटर यात ओतावे. 

कोण म्हणतं, वेटलॉससाठी पराठा खाणं सोडा? पराठ्याचे पौष्टिक ८ स्टफिंग्ज-वजन होईल झरझर कमी...

४. आता गॅसच्या मंद आचेवर हे व्यवस्थित भाजून चॉकलेट बॅटरचा ब्रेड स्लाईस तयार करून घ्यावा. २ ते ३ मिनिटे गॅसच्या मंद आचेवर भाजून ब्रेड स्लाईस तयार करून घ्यावा. मग हा तयार ब्रेड स्लाईस सुरीच्या मदतीने बरोबर मधोमध कापून त्याचे दोन भाग करून घ्यावेत. 
५. आता या ब्रेड स्लाईसवर आपण आपल्या आवडीनुसार चॉकलेट स्प्रेड आणि चॉको चिप्स भुरभुरवून घालू शकता. त्यानंतर दुसरा ब्रेड स्लाईस त्यावर ठेवून सँडविच सारखे बरोबर मधून कापून दोन भाग करावेत. 

मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी आणि क्रिमी किंवा चॉकलेटी भुकेसाठी मस्त चॉकलेट सँडविच खाण्यासाठी तयार आहे. आपण हे चॉकलेट सँडविच मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये काहीतरी वेगळं खायला म्हणून देऊ शकतो.

Web Title: No bread double chocolate sandwich How To Make Chocolate Sandwich At Home Chocolate Sandwich At Home Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.