इस्टाग्रामवर काहीही व्हायरल होऊ शकतं. सोशल मडियावर काही ना काही ट्रेंडींग होतच असतं. त्यात फुड कॅटेगरीही आहे. एखादा पदार्थ व्हायरल होतो आणि मग जगभरातून लोकं तो करुन पाहतात. जसं लॉकडाऊनमध्ये डालगोना कॉफी व्हायरल झाली अगदी तसंच. सध्या एक विचित्र असा पदार्थ ट्रेंड होत आहे. (New viral trend, People are making pasta in a cooker? You might be surprised to see the recipe because...)कुकरमध्ये केलेला पास्ता. इटालियन लोकांनी व्हिडिओ पाहीला तर त्यांना चक्करच येईल अशी देसी रेसिपी. पास्ताची योग्य आणि पारंपरिक रेसिपी न वापरता खिचडी प्रमाणे केलेली ही रेसिपी व्हायरल चांगली झाली. या ट्रेंडला अनेकांनी नावं ठेवली तर अनेकांनी करुन पाहीले. काही जणांना चवही आवडली तर काही जण मज्जा म्हणून करुन पाहतात. पाहा व्हायरल झालेली रेसिपी .
साहित्य
पास्ता, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, आलं , लसूण, लाल तिखट, मीठ
कृती
१. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. त्याची पेस्ट तयार करायची. टोमॅटो बारीक चिरुन घ्यायचा.
२. एका कुकरमध्ये तेल घ्यायचे. तेलात कांदा घालायचा आणि मस्त परतून घ्यायचा. पास्ता परतल्यावर त्यात लसणाची पेस्ट घालायची. परतून घ्यायची. त्यात लाल तिखट घालायचे. मीठ घालायचे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि परतून घ्यायचे. सगळं छान परतल्यावर त्यात पास्ता घालायचा. कच्चाच घालायचा.
३. त्यात पाणी घालायचे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. परतायचे आणि नंतर कुकर लावायचा. दोन ते ती न शिट्या काढायच्या. कुकर उघडल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालायची. ढवळून घ्यायचे आणि गरमागरम खायचे.
