Lokmat Sakhi >Food > Navratri 2025 Fast Special Recipe : उपवास म्हणून हे ४ पदार्थ खाल्ले तर वाढेल वजन आणि शुगर...

Navratri 2025 Fast Special Recipe : उपवास म्हणून हे ४ पदार्थ खाल्ले तर वाढेल वजन आणि शुगर...

Navratri vrat foods to avoid : what not to eat in Navratri fasting : Navratri fasting mistakes : unhealthy fasting foods in Navratri : avoid these foods in Navratri vrat : नवरात्रीचा उपवास करणार असाल तर कोणते पदार्थ खाणे टाळावे ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 12:33 IST2025-09-19T12:32:50+5:302025-09-19T12:33:40+5:30

Navratri vrat foods to avoid : what not to eat in Navratri fasting : Navratri fasting mistakes : unhealthy fasting foods in Navratri : avoid these foods in Navratri vrat : नवरात्रीचा उपवास करणार असाल तर कोणते पदार्थ खाणे टाळावे ते पाहा...

Navratri vrat foods to avoid what not to eat in Navratri fasting Navratri fasting mistakes unhealthy fasting foods in Navratri avoid these foods in Navratri vrat | Navratri 2025 Fast Special Recipe : उपवास म्हणून हे ४ पदार्थ खाल्ले तर वाढेल वजन आणि शुगर...

Navratri 2025 Fast Special Recipe : उपवास म्हणून हे ४ पदार्थ खाल्ले तर वाढेल वजन आणि शुगर...

नवरात्रीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. आपल्यापैकी बरेचजण नवरात्रीला उपवास करतात. उपवास म्हटलं की, काही मोजकेच पदार्थ आपण खातो. उपवास (avoid these foods in Navratri vrat) असला की आपल्या खाण्यावर थोडी बंधन येतात. परंतु काहीजण उपवासाच्या नावाने उपवासाचे गोडधोड, तेलकट, तूपकट ताव मारत खातात. याचबरोबर, आपण बाजारात (Fast Special Recipe) विकत मिळणारे उपवासाचे पदार्थ चवीला चांगले लागतात म्हणून पोटभर खातो. अशाप्रकारे, उपवासाच्या दिवशी सतत असे पदार्थ खाल्ल्यने त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो(what not to eat in Navratri fasting).

उपवासात खाल्ले जाणारे बहुतेक पदार्थ आरोग्यदायी मानले जातात, परंतु ते शिजवण्याची किंवा तयार करण्याची पद्धत त्यातील पौष्टिक गुणधर्म काढून त्यांना अनहेल्दी करु शकते. जर तुम्ही पौष्टिक पदार्थ चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने खाल्ले, तर तब्येत बिघडू शकते. उपवासादरम्यान, आपली तब्येत व आरोग्य सांभाळून योग्य ती काळजी (unhealthy fasting foods in Navratri) घेणे आवश्यक असते. उपवास करताना, काही पदार्थ खाल्ल्याने पचन बिघडू शकते, रक्तातील साखर वाढू शकते आणि शरीराला योग्य पोषण मिळत नाही. यासाठी, नवरात्रीचा उपवास करणार असाल तर कोणते पदार्थ खाणे टाळावे ते पाहूयात. 

उपवासा दरम्यान कोणते पदार्थ खाणे टाळावे ? 

१. चहा आणि कॉफी :- बरेचजण उपवासाच्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफी पिऊन करतात. पण उपाशी पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने आपल्या  आतड्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे ब्लोटिंग, अ‍ॅसिडिटी आणि अस्वस्थता जाणवू शकते. तसेच, यामध्ये घातलेली साखर रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. त्यामुळे, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे टाळले पाहिजे. त्याऐवजी, चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी तुम्ही मूठभर ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. 

२. तळलेले अन्नपदार्थ :- बरेचदा आपण उपवासाला साबुदाणा वडे, चिप्स, फ्राइज यासारखे तळलेले पदार्थ खूप जास्त खातो. हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. दररोज जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाल्ल्याने अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. खरंतरं, या तळलेल्या  पदार्थांमध्ये कॅलरी जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल, तर उपवास करताना असे तेलकट - तूपकट पदार्थ खाणे टाळावे. कारण ते रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. इतकंच नव्हे, तर हे पदार्थ पचनाशी संबंधित समस्या देखील अधिक जास्त वाढवू शकतात.

गरम चपाती डब्यांत ठेवताच ओली होते ? ५ ट्रिक्स - चपाती ओली न होता राहील मऊ लुसलुशीत...

३. फळांचे ज्यूस :- उपवासा दरम्यान जर आपण इन्स्टंट एनर्जी वाढवण्यासाठी फ्रूट ज्यूस पीत असाल तर अशी चूक अजिबात करू नका. कारण, बहुतेक फळांच्या रसांमध्ये फायबर आणि पोषक तत्वांची कमतरता असते. अशा परिस्थितीत, ते प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. याऐवजी, तुम्ही स्मूदी किंवा भाज्यांचे रस पिऊ शकता. जर तुम्ही हायड्रेशन होऊ  फळांचे रस पित असाल, तर त्याऐवजी नारळपाणी, लिंबूपाणी आणि पाणी पिऊ शकता.

शेवग्याच्या पानांची चटणी म्हणजे सुपरफूड! रोज खा-हाडं होतील मजबूत -स्वस्तात मस्त औषध...

४. मिठाई किंवा गोड पदार्थ :- या व्यतिरिक्त, खूप जास्त मिठाई किंवा साखरयुक्त पदार्थ खाणे टाळा. जर तुम्ही उपवासात पोट भरण्यासाठी गोडधोड पदार्थ खात असाल, तर पोट भरले तरी वजन आणि रक्तातील साखर वाढण्याची शक्यता वाढते. जर तुम्हाला तुमचे वजन वाढू द्यायचे नसेल आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू नये असे वाटत असेल, तर उपवासात जास्त गोडधोड पदार्थ खाणे टाळा.

उपवास करताना काय खावे ? 

जर आपण देखील नवरात्रीचा उपवास करणार असाल तर कोणते पदार्थ खावेत ते पाहूयात. उपवासात शरीराला ऊर्जा, हायड्रेशन आणि पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी पौष्टिक आणि आरोग्याला फायदेशीर असणारे असे पदार्थ खाण्यावर अधिक भर द्यावा. जसे की फळे, सुक्या मेव्याचे प्रकार, सातू व शिंगाड्याचे पीठ, साबुदाणा, वरीचे तांदूळ, बटाटा, रताळे, काकडी, भोपळा, टोमॅटो यांसारख्या भाज्या, तसेच दूध, दही, पनीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खावेत.

Web Title: Navratri vrat foods to avoid what not to eat in Navratri fasting Navratri fasting mistakes unhealthy fasting foods in Navratri avoid these foods in Navratri vrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.