उपवासाच्या पदार्थांमध्ये वेगवेगळे पदार्थ नवरात्रीच्या (Navratri 2025) दिवसांत ट्राय केले जातात. नेहमी साबुदाणा किंवा साबुदाण्याचे पदार्थ न खाता तुम्ही या नवरात्रीच्या उपवासांसाठी नेहमीचं साहित्य वापरून हटके,चटपटीत उपवासाचे पदार्थ ट्राय करू शकता. (Upvas Idli Recipe)
साबुदाणा वडे, साबुदाण्याची खिचडी जास्त तेलकट होते म्हणून लोक खाणं टाळतात. अशावेळी नेहमी वरीचा भात किंवा राजगिरा खाण्यापेक्षा तुम्ही उपवासाच्या मऊसूत इडल्या ट्राय करू शकता उपवासाच्या इडल्या करायला अतिशय सोप्या असतात. या इडल्या खाल्ल्यानं बराचवेळ पोट भरलेलं राहतं. उपवासाच्या इडल्यांची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Upwas Idli At Home For Navratri)
उपवासाच्या इडलीसाठी लागणारं साहित्य
१ कप भगर (वरई)
१/२ कप साबुदाणा
१/२ कप दही
१/४ चमचा जिरे
२ हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ
पाणी
तेल किंवा तूप (इडली पात्र ग्रीस करण्यासाठी)
इनो फ्रूट सॉल्ट (उपवासासाठी चालणारे) किंवा सोडा (ऐच्छिक)
कृती
भगर आणि साबुदाणा वेगवेगळे स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर भगर आणि साबुदाणा एकत्र करून त्यात दही आणि पुरेसे पाणी घालून ४ ते ५ तास भिजत ठेवा.
भिजलेला साबुदाणा आणि भगर यांचे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. गरज वाटल्यास थोडे पाणी घाला. हे मिश्रण जास्त पातळ नसावे. इडलीच्या पिठासारखं सरसरीत ठेवा.
२ मिनिटांत भरपूर पीठ मळण्याची पाहा १ सोपी ट्रिक, चपात्याही होती मऊ-फुगतील टम्म
वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळा. इडली करण्याआधी, त्यात इनो फ्रूट सॉल्ट किंवा सोडा घालून पुन्हा एकदा चांगले ढवळून घ्या. इनो घातल्यानंतर लगेच इडली बनवायला सुरुवात करा.
कडूनिंब आणि खडीसाखरेचं औषध ठेवते अनेक आजारांना दूर, त्वचाही होते नितळ आणि मऊ
इडली पात्राला तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्या. प्रत्येक साच्यात चमच्याने पीठ घालून इडल्या तयार करा. इडली पात्रामध्ये पाणी घालून मध्यम आचेवर १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या. इडली शिजली आहे का हे पाहण्यासाठी सुरी किंवा टूथपिक घालून तपासू शकता. ती स्वच्छ बाहेर आल्यास इडली तयार झाली आहे. गरमागरम इडली शेंगदाणा चटणी, बटाट्याची भाजी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.