Lokmat Sakhi >Food > Navratri 2025 : साबुदाण्याचे खुसखुशीत थालिपीठ करण्याची खास रेसिपी; १० मिनिटांत बनेल खमंग थालिपीठ

Navratri 2025 : साबुदाण्याचे खुसखुशीत थालिपीठ करण्याची खास रेसिपी; १० मिनिटांत बनेल खमंग थालिपीठ

Navratri 2025 : थालिपीठ तुम्हाला नारळाची चटणी किंवा दाण्याची आमटी या सोबत खाता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 20:08 IST2025-09-21T19:37:44+5:302025-09-21T20:08:47+5:30

Navratri 2025 : थालिपीठ तुम्हाला नारळाची चटणी किंवा दाण्याची आमटी या सोबत खाता येईल.

Navratri 2025 : How To Make Upwasache Thalipeeth Upwasache Thalipith Making Tips | Navratri 2025 : साबुदाण्याचे खुसखुशीत थालिपीठ करण्याची खास रेसिपी; १० मिनिटांत बनेल खमंग थालिपीठ

Navratri 2025 : साबुदाण्याचे खुसखुशीत थालिपीठ करण्याची खास रेसिपी; १० मिनिटांत बनेल खमंग थालिपीठ

उद्यापासून नवरात्रीला (Navratri 2025) सुरूवात होत आहे. तुम्ही नवरात्रीच्या उपवासाला खाण्यासाठी खुसखुशीत साबुदाण्याचे थालिपीठ करू शकता. साबुदाण्याची खिचडी खायला अनेकांना कंटाळा येतो (Sabudana Thalipith Recipe). नेहमी नेहमी खिचडी, वरीचा भात हे कॉमन पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही खमंग थालिपीठ करू शकता. हे थालिपीठ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. थालिपीठ तुम्हाला नारळाची चटणी किंवा दाण्याची आमटी या सोबत खाता येईल.(How To Make Sabudana Thalipith)

साबुदाण्याचे थालिपीठ करण्यासाठी लागणारं साहित्य

1 कप साबुदाणा

1 मोठा उकडलेला बटाटा

1/4 कप भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट

1-2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

1/2 चमचा जिरे

चवीनुसार शेंधा मीठ (उपवासाचे मीठ)

बारीक चिरलेली कोथिंबीर 

थालिपीठ करण्याची सोपी कृती  (Sabudana Thalipeeth Making Process)

सर्वप्रथम, साबुदाणा चांगला धुऊन घ्या. तो पूर्णपणे बुडेल एवढेच पाणी घालून 4-5 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. यामुळे साबुदाणा मऊ आणि फुललेला होईल. जास्त पाणी घालू नका, नाहीतर थालिपीठ चिकट होईल.

भिजवलेल्या साबुदाण्यातील जास्तीचे पाणी काढून टाका. आता एका मोठ्या भांड्यात हा साबुदाणा घ्या. त्यात उकडलेला आणि किसलेला बटाटा, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरे आणि चवीनुसार शेंधा मीठ घाला. सर्व साहित्य हाताने चांगले एकजीव करा.

हात खराब न करता 2 मिनिटांत मळून होईल पीठ; १ सोपी ट्रिक, मऊसूत-फुगलेल्या होतील चपात्या

एका प्लास्टिकच्या पेपरवर किंवा ओल्या सुती कापडावर थोडे तेल किंवा तूप लावा. आता तयार मिश्रणाचा एक छोटा गोळा घ्या आणि त्याला थालिपीठाचा गोल आकार द्या. थालिपीठ जास्त जाड किंवा जास्त पातळ नसावे. मधोमध एक छिद्र पाडा, जेणेकरून थालिपीठ आतूनही चांगले शिजेल.

गॅसवर एक नॉन-स्टिक तवा मध्यम आचेवर गरम करा. त्यावर थोडे तेल किंवा तूप सोडा. आता तयार केलेले थालिपीठ हळूच तव्यावर घाला. कडेने थोडे तेल सोडा.

उपवासाला 5 मिनिटांत करा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स, बटाटा न उकडता-न वाळवता पटकन होतील

थालिपीठाला एका बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत आणि ते कुरकुरीत होईपर्यंत भाजा. नंतर पलटा आणि दुसऱ्या बाजूनेही असेच भाजा. दोन्ही बाजूंनी थालिपीठ चांगले भाजले गेल्यावर ते कुरकुरीत आणि चवदार होईल.

Web Title: Navratri 2025 : How To Make Upwasache Thalipeeth Upwasache Thalipith Making Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.