Join us

उपवासाला करा पचायला हलकी, स्वादीष्ट साबुदाणा खीर; १० मिनिटांत बनेल दाट-चवदार खीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:30 IST

Navratri 2025 : नैवेद्यासाठी ही खीर करायची असेल तर हा सुद्धा उत्तम पर्याय आहे.

नवरात्र (Navratri 2025) उत्सवाला सुरूवात झाली असून अनेक घरांमध्ये उपवासाचे पदार्थ बनवले जात आहे. नैवेद्यासाठी किंवा  हलकं फुलकं तुम्हाला काहीतरी खायचं असेल तर तुम्ही साबुदाण्याची खीर बनवू शकता. साबुदाण्याची खीर पचायला हलकी असते. कमीत कमी साहित्यात तुम्ही स्वादीष्ट खीर बनवू शकता. या खिरीत दूध, ड्रायफ्रुट्स, अशा पौष्टीक पदार्थांचा समावेश असतो त्यामुळे पोटही भरतं आणि बराचवेळ एनर्जीसुद्धा राहते. साबुदाण्याची खीर करण्याची सोपी रेसिपी पाहूया.(How To Make Sabudana Kheer)

साबुदाण्याची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य

1) साबुदाणा:अर्धी वाटी

2) दूध: २ कप

3) साखर: अर्धी वाटी (किंवा चवीनुसार)

4) वेलची पावडर: अर्धा चमचा

5) बारीक केलेला सुकामेवा:(बदाम, काजू, पिस्ता) आवडीनुसार 

6) तूप: १ चमचा

साबुदाण्याची खीर करण्याची सोपी कृती

आधी साबुदाणा स्वच्छ धुऊन घ्या. तो एका वाटीत घेऊन त्यात थोडं पाणी घाला आणि रात्रभर किंवा कमीत कमी ३-४ तास भिजत ठेवा. साबुदाणा पूर्णपणे फुगून मऊ झाला पाहिजे.

२ मिनिटांत भरपूर पीठ मळण्याची पाहा १ सोपी ट्रिक, चपात्याही होती मऊ-फुगतील टम्म एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करा. त्यात भिजवलेला साबुदाणा घाला आणि २-३ मिनिटे परता. यामुळे साबुदाणा चिकटणार नाही.

आता त्यात दूध घाला आणि चमच्याने सतत ढवळत रहा. साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत आणि खीर थोडी घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. याला साधारणपणे १०-१५ मिनिटे लागतील. साबुदाणा पूर्णपणे शिजल्यावर त्यात साखर घाला आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा. काहीजण खीर करताना त्यात कंडेन्स मिल्क घालतात, तुम्हीसुद्धा  खीर जाडसर होण्यासाठी कंडेन्स मिल्क यात घालू शकता. 

नवरात्रात पटकन करा मऊसूत,लुसलुशीत उपवासाच्या  इडल्या;पाहा इडलीची सोपी रेसिपी

आता खीरमध्ये बारीक चिरलेला सुकामेवा आणि वेलची पावडर घाला. सर्व मिश्रण चांगले एकत्र करा. गॅस बंद करा. गरमागरम आणि स्वादिष्ट साबुदाण्याची खीर तयार आहे. तुम्ही ही खीर गरम किंवा थंड करून खाऊ शकता. जर तुम्हाला  नैवेद्यासाठी ही खीर करायची असेल तर हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. पौष्टीक खिरीचा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकता.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२५कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स