Join us

Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:55 IST

Navratri 2025: नवरात्रीत अनेक जण कांदा, लसूण खात नाहीत, पण पावसाळी माहोल पाहता खवय्यांना वडापावची क्रेव्हिंग होत असेल तर हा आहे उत्तम पर्याय... 

उपास करायचा ठरवला की नेमके असे पदार्थ आठवतात की नुसत्या आठवणीनेही उपास मोडेल की काय अशी भीती वाटते. फोनवर स्क्रोलिंग करावे तर सगळेच जण उपासाचे पदार्थ दाखवण्यात व्यग्र झालेले दिसतात. अशाने उपासाचा हेतू कसा सफल होणार सांगा? पण गंमत माहितीय का? मन मारून केलेला उपास हा उपासना पूर्ण होऊ देत नाही. कारण जी गोष्ट आपण टाळतो ती आपल्या मनात रेंगाळत राहते, विचारात राहते आणि मन त्या गोष्टींचा ध्यास घेते. मनावर संयम मिळवणे हा उपासाचा मूळ हेतू. तो साध्य करता आला नाही तरी वाईट वाटून घेऊ नका. शक्य तेवढा कांदा, लसूण, मांसाहार यांचा वापर नवरात्रीत(Navratri 2025) टाळा आणि पर्यायी पदार्थांचे(Navratri special food 2025) सेवन करा. 

अशाच वडापाव क्रेव्हिंग्जवर अर्थात वडापाव खाण्याची इच्छा निर्माण झाल्यास त्यावर सोपा पर्याय म्हणजे उपासाचा बटाटेवडा. जो तुम्ही घरच्या साहित्यातून झटपट करू शकता. पाहूया साहित्य आणि कृती. 

उपासाचा बटाटे वडा : 

साहित्य : 

उकडलेले बटाटे आले मिरची जिरे पेस्ट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वरई पीठपाणीकश्मिरी लाल तिखट मीठतळण्यासाठी तेल

कृती : 

सर्वप्रथम उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. 

त्यात आले, मिरची, जिरे पेस्ट, शेंगदाण्याचे कूट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा. 

तयार सारणाचे गोल वडे करून घ्या. 

वरीचे पीठ घ्या, त्यात कश्मिरी लाल तिखट, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून सरबरीत मिश्रण तयार करा. 

वड्यांवर पिठाचे चांगले कोटिंग करून तापलेल्या तेलात मध्यम आचेवर सोनेरी-खरपूस होईपर्यंत तळून घ्या. 

उपासाचे कुरकुरीत बटाटे वडे खाण्यासाठी तयार.!

पहा रेसेपी व्हिडीओ : 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२५अन्नपाककृतीनवरात्री