दिवाळीत (Diwali 2025) बऱ्याचजणांच्या घरी नानकटाई बनवल्या जातात. नानकटाई हा अतिशय चवदार आणि खुसखुशीत पदार्थ आहे. नानकटाई परफेक्ट होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते (How To Make Perfect Nankatai). नानकटाई बिघडू नये अगदी बाजारात मिळते तशी परफेक्ट व्हावी यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (Nankatai Making Tips Nankatai Recipe)
पदार्थांची निवड
नानकटाईसाठी नेहमी दाणेदार तूप किंवा रूम टेम्परेचरचं लोणी वापरा ते खूप पातळ नसावे. फ्रिजमधील तूप वापरू नका. काही लोक डालडा वापरतात पण तूप वापरणंच उत्तम ठरेल. मैद्यासोबत थोडं बेसन आणि रवा वापरल्यास नानकटाईला उत्तम पोत मिळतो. बेकिंग सोडा अगदी चिमूटभर वापरा जास्त वापरल्यास नानकटाईची चव बिघडते.
पीठ फेटताना ही काळजी घ्या
तूप आणि पिठी साखर व्यवस्थित फेटून घ्या. हे मिश्रण हलकं आणि फ्लफी व्हायला हवं. फेटण्याच्या प्रक्रियेसाठी कमीत कमी ८ ते १० मिनिटं लागतात. व्यवस्थित फेटले गेले नाही तर नानकटाई घट्ट आणि चपटी होते.
दिवाळीत शिवा फॅशनेबल ब्लाऊज, मागच्या गळ्याचे १० युनिक पॅटर्न, सुंदर-आकर्षक दिसाल
पीठ असं मळा
पिठाचे मिश्रण तयार झाल्यावर ते जास्त मळू नका. फक्त सर्व घटक एकत्र करून एक गोळा तयार करून हलक्या हातानं मळा. पीठ जास्त मळल्यास किंवा दाबल्यास त्यातील ग्लुटेन सक्रिय होते ज्यामुळे नानकटाई कुरकुरीत न होता चिवट होते.
गोळ्यांचा आकार आणि बेकिंग
नानकटाईचे गोळे करताना ते चिरलेले किंवा क्रॅक आलेले नसावेत अगदी गुळगुळीत गोळे तयार करा. गोळे तयार झाल्यावर बेक करण्यापूर्वी किमान २० ते ३० मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे तूप सेट होते आणि बेक करताना नानकटाई पसरत नाही.
दिवाळीसाठी घ्या खास मोरपंखी पैठणी; मोरपिशी रंगात १० डिजाईन्स, साडी दिसेल शोभून
बेकिंगनंतर हे करा
ओव्हन नेहमी प्री हीट करा. नानकटाई १६० ते १८० डिग्री सेल्सियस तापमानावर बेक करा. जास्त तापमानावर ती बाहेरून करपते आणि आतून कच्ची राहते. नानकटाईचा रंग हलका सोनेरी झाल्यावर त्यावर चीर आल्यावर ती परफेक्ट बेक झाली असं समजा. नानकटाई बेक झाल्यावर गरम असताना फारच मऊ आणि नाजूक असते ती लगेच ट्रेमधून काढू नका. नानकटाई ट्रेमध्ये किंवा बेकिंग ट्रेवर पूर्ण थंड होऊ द्या. थंड झाल्यावरच कडक आणि खुसखुशीत होते आणि तिचा आकार टिकून राहतो.