lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > घरीच करून बघा अस्सल नागपुरी ऑरेंज बर्फी, चव एकदम भारी- बघा खास रेसिपी

घरीच करून बघा अस्सल नागपुरी ऑरेंज बर्फी, चव एकदम भारी- बघा खास रेसिपी

Nagpur special orange barfi recipe in marathi:नागपूरची खासियत असणारी ऑरेंज बर्फी घरी कशी करायची ते पाहा... बघा ही एकदम खास रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 05:21 PM2023-12-29T17:21:36+5:302023-12-29T17:22:28+5:30

Nagpur special orange barfi recipe in marathi:नागपूरची खासियत असणारी ऑरेंज बर्फी घरी कशी करायची ते पाहा... बघा ही एकदम खास रेसिपी

Nagpur special orange barfi recipe in marathi, How to make nagpuri santra barfi at home in marathi | घरीच करून बघा अस्सल नागपुरी ऑरेंज बर्फी, चव एकदम भारी- बघा खास रेसिपी

घरीच करून बघा अस्सल नागपुरी ऑरेंज बर्फी, चव एकदम भारी- बघा खास रेसिपी

Highlightsसध्या बाजारात भरपूर प्रमाणात संत्री मिळत आहेत. त्यामुळे ही रेसिपी एकदा ट्राय करून पाहा. एकदा बर्फी केली तर ती १५ दिवस टिकेल.

नागपूरचे बरेच खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. पण त्यातल्या त्यात नागपूर म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती तिथली ऑरेंज बर्फी. तिची चव, तिचं टेक्स्चर एकदमच वेगळं असतं. आपल्या इतर कोणत्याही मिठायांना तशी चव नाहीच. तुम्हीही नागपुरी संत्रा बर्फीचे चाहते असाल तर आता घरच्याघरी ही ऑरेंज बर्फी कशी करायची ते पाहा... रेसिपी अगदी सोपी आहे. आपण जसा एखादा हलवा करतो, त्याचप्रमाणे आपल्याला ऑरेंज बर्फी करता येते (How to make nagpuri santra barfi at home in marathi). सध्या बाजारात भरपूर प्रमाणात संत्री मिळत आहेत. त्यामुळे ही रेसिपी एकदा ट्राय करून पाहा. एकदा बर्फी केली तर ती १५ दिवस टिकेल.(Nagpur special orange barfi recipe in marathi)

 

ऑरेंज बर्फी किंवा संत्रा बर्फी करण्याची रेसिपी

साहित्य

६ ते ७ मोठ्या आकाराच्या संत्री

५० ग्रॅम साखर

स्वयंपाक घरात खूप पसारा दिसतो- सामान ठेवायला जागाच नाही? बघा ३ पर्याय- पसारा होईल गायब

खोबऱ्याचा किस १०० ग्रॅम

फूड कलर १ टीस्पून

खवा २५० ग्रॅम

सिल्वर वर्क

ऑरेंज झेस्ट २ चमचे

 

रेसिपी

१. सगळ्यात आधी संत्रीच्या बिया आणि सालं काढून घ्या आणि त्याचा पल्प वेगळा करा.

२. आता गॅसवर एक कढई तापायला ठेवा. त्यामध्ये संत्रीचा गर टाका आणि तो व्यवस्थित शिजवून घ्या.

कडिपत्त्याचं झाड वाढेल भराभर, फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या- कडिपत्ता कधीच सुकणार नाही

३. संत्रीच्या गराला थोडी उकळी येऊ लागली की त्यात साखर आणि ऑरेंज रंगाचा फूड कलर टाका. फूड कलर टाकला नाही तरी चालेल.

४. यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाले की त्यात खोबऱ्याचा किस टाका आणि पुन्हा सगळे मिश्रण एकत्रित हलवून घ्या.

५. यानंतर त्यामध्ये ऑरेंज झेस्ट म्हणजेच संत्रीच्या सालींचा किस टाका. आणि त्याचवेळी खवा टाका.

 

६. आता पुन्हा हे मिश्रण हलवा. व्यवस्थित एकत्र होऊन ते घट्ट होत आले की गॅस बंद करा.

मायक्रोवेव्ह घाण झाले- कुबट वास येतो? ५ मिनिटांचा सोपा उपाय- होईल नव्यासारखं चकाचक

७. यानंतर एका भांड्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण टाका. त्यावरून चांदीचा वर्ख लावा. हा वर्ख नाही लावला तरी चालेल.

८. मिश्रण थंड होऊन छान सेट झालं की झाली तयार अस्सल नागपुरी संत्रा बर्फी...

 

Web Title: Nagpur special orange barfi recipe in marathi, How to make nagpuri santra barfi at home in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.