नागपंचमीच्या सणाचा गोडवा वाढविणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे पुरणाचे दिंड. एरवी सणाच्या दिवशी आपण पुरणपोळी खातो. मात्र नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंड केले जातात. पुरणाचे दिंड करणं हे थोडं ट्रिकी काम. कारण एरवी पुरणपोळी करण्याची सवय असल्याने ती उत्तम जमते. पण दिंड वर्षातून एकदाच केले जातात (nagpanchami special puranache dind recipe). त्यामुळे ते करताना कधी खूप सैल होतात तर कधी त्यात किती पुरण भरायला हवं याचा अंदाज चुकल्याने ते कमी गोड होतात (Traditional Maharashtrian Recipe For Nag Panchami Festival). त्यामुळेच दिंड अगदी परफेक्ट जमण्यासाठी ही परफेक्ट रेसिपी एकदा बघून घ्या.(how to make puranache dind?)
पारंपरिक पद्धतीने पुरणाचे दिंड करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी हरबरा डाळ
१ वाटी गूळ
४ ते ५ केशराच्या काड्या
टॅनिंग वाढलं, त्वचा डल दिसते, ग्लो कमी झाला? तिन्ही समस्यांवर १ उपाय- रूपच पालटून जाईल
२ ते ३ चमचे तूप
२ वाट्या कणिक
चिमूटभर मीठ
जायफळ आणि वेलची पावडर प्रत्येकी १ चमचा
कृती
दिंड करण्यासाठी सगळ्यात आधी हरबरा डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला लावून द्यावी. १ वाटी हरबरा डाळीसाठी साधारण अडीच वाट्या पाणी घ्यावे. मध्यम आचेवर साधारण ४ ते ५ शिट्ट्या करून डाळ अगदी मऊ शिजवून घ्यावी.
मंगळागौर स्पेशल:सहावार साडीच नऊवारीसारखी नेसण्याची मस्त ट्रिक, नेसायलाही सोपी
यानंतर डाळीमधले जास्तीचे पाणी पुर्णपणे निथळून घ्यावे आणि त्यानंतर डाळ आणि गूळ एकत्रितपणे कढईमध्ये घालून पुरणाला चटका देऊन घ्या. गॅस बंद करण्याच्या १- २ मिनिटे आधी पुरणामध्ये जायफळ पावडर, वेलची पूड घालावे. यानंतर पुरणयंत्रातून पुरण बारीक करून घ्यावे.
पुरण शिजून होईपर्यंत कणिक भिजवून घ्यावी. कणिक थोडी घट्ट भिजवावी. आणि कणिक भिजवताना त्यात केशराच्या काड्या भिजत घातलेले पाणी, गरम केलेले साजूक तूपही घालावे. भिजवलेली कणिक १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.
श्रावणी सोमवार: उपवासामुळे दुपारनंतर गळून गेल्यासारखं होतं? ५ टिप्स- दिवसभर राहाल एकदम फ्रेश
यानंतर कणकेचा गोळा घेऊन तो पुरीएवढा लाटून घ्या. जेवढी गोळा असेल तेवढेव पुरण घ्या आणि ते पुरीमध्ये भरा. अशा पद्धतीने पुरणाचे दिंड तयार करून घ्या आणि इडलीपात्रात ठेवून ते १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या. गरमागरम दिंड साजूक तूप टाकून खावेत.