दिवाळी फराळ म्हटलं की, घरात खमंग आणि खुसखुशीत पदार्थांची रेलचेल असतेच. करंजी, चिवडा, लाडू, शेव या पारंपरिक पदार्थांसोबतच नानकटाई देखील मोठ्या हौसेने केली जाते. फराळाच्या ताटातील गोड, खुसखुशीत अशी नानकटाई म्हणजे सगळ्यांच्याच आवडीची... जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि साजूक तुपाचा सुगंध व चवीला गोड असणारी ही नानकटाई म्हणजे फराळातील खास पदार्थ...बेकरीतून महागडी नानकटाई विकत आणण्याऐवजी, घरच्याघरीच शुद्ध साजूक तुपात आणि अगदी सोप्या पद्धतीने देखील आपण विकतसारखीच नानकटाई तयार करु शकतो.पण अनेक गृहिणींची तक्रार असते की, नानकटाई बनवण्यासाठी ओव्हन किंवा मोठी कढई लागते, जी प्रत्येकाकडे उपलब्ध नसते. मात्र, आता ही समस्या दूर झाली आहे!(How To Make Naankatai In Appe Pan At Home).
तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या आप्पे पात्राचा वापर करून तुम्ही अगदी बेकरीसारखी परफेक्ट नानकटाई घरीच तयार करु शकता. आप्पे पात्रात नानकटाई तयार करण्याची ही पद्धत इतकी सोपी आणि झटपट आहे की, अगदी स्वयंपाकघरात नवीन असलेली व्यक्तीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात खमंग आणि खुसखुशीत नानकटाई तयार करता येऊ शकतात. बेकरीत न जाता घरच्याघरीच आप्पे पात्रात नानकटाई तयार (Naankhatai Biscuit in appe pan) करण्याची सोपी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. गव्हाचे पीठ - १ कप २. बेसन - १/२ कप ३. बारीक रवा - १/२ कप ४. खायचा सोडा - १ टेबलस्पून ५. साजूक तूप - १/२ कप ६. पिठीसाखर - १ कप ७. वेलची पूड - चवीनुसार८. मीठ - चवीनुसार९. ड्रायफ्रूट्स काप - १/२ कप
सोडा न वापरता करा, विकतसारखी आलू भुजिया शेव! चवीला अप्रतिम, कुरकुरीत - यंदाचा फराळ करा खास...
चिवडा मऊ पडतो, सादळतो? ७ टिप्स - डब्यांतील चिवडा संपेपर्यंत राहील तसाच कुरकुरीत...
कृती :-
१. एका मोठ्या चाळणीमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, बारीक रवा, खायचा सोडा असे सगळे जिन्नस एकत्रित करून व्यवस्थित चाळून घ्यावे. २. दुसऱ्या बाऊलमध्ये साजूक तूप घेऊन त्यात पिठीसाखर घालावी, मग हे मिश्रण चमच्याने किंवा रवीने एकत्रित फेटून घ्यावे. (हे मिश्रण फेटून घेतल्यावर वाटीभर पाण्यात या मिश्रणाचे काही थेंब घालून पाहावे, जर हे थेंब पाण्यावर तरंगले तर समजावे की मिश्रण व्यावस्थित फेट्ले गेले आहे.)३. मग या फेटून घेतलेल्या मिश्रणात, चाळून घेतलेलं गव्हाचे पीठ व बेसनाचे मिश्रण घालावे. मग याच मिश्रणात चवीनुसार वेलची पूड व मीठ घालावे. हे सगळे जिन्नस एकत्रित करुन पीठ मळून घ्यावे.
४. मग या तयार पिठाचे गोळे छोटे गोलाकार आकार देत नानकटाई करून घ्यावी. चमच्याच्या मदतीने यावर हवी तशी डिझाईन करुन घ्यावी. ५. आप्पे पत्राला थोडे साजूक तूप किंवा हलकेच तेलाचे बोट फिरवून घ्यावे. मग मंद आचेवर तवा ठेवून त्यावर झाकण ठेवून तो १० ते १५ मिनिटे प्री - हिट करून घ्यावा. ६. मग या प्री - हिट केलेल्या तव्यावर आप्पे पात्र ठेवून त्यात तयार नानकटाई बेक होण्यासाठी ठेवावी. वरून झाकण ठेवून मंद आचेवर १ तास ही नानकटाई व्यवस्थित खरपूस भाजून घ्यावीत. ७. तासाभरानंतर गॅस बंद करून नानकटाई त्याच आप्पे पत्रात उलटी बाजू करून ठेवावीत.
बेकरीत न जाता घरच्याघरीच मस्त खुसखुशीत विकतसारखी नानकटाई खायला तयार आहे.
Web Summary : Skip the bakery! This Diwali, prepare delicious Nankatai at home using an appe pan. This recipe avoids ovens, offering a simple method for creating perfect, melt-in-your-mouth Nankatai. Use simple ingredients like wheat flour, gram flour, semolina, ghee, and powdered sugar.
Web Summary : बेकरी को छोड़ें! इस दिवाली, घर पर अप्पे पैन का उपयोग करके स्वादिष्ट नानकटाई तैयार करें। यह रेसिपी ओवन से बचाती है, जो एकदम सही, मुंह में पिघल जाने वाली नानकटाई बनाने के लिए एक सरल तरीका प्रदान करती है। गेहूं का आटा, बेसन, सूजी, घी और पिसी चीनी जैसी सरल सामग्री का उपयोग करें।