बटाट्याची भाजी म्हणजे लहान - मोठे सगळ्यांच्याच आवडीची. करायला सोपी आणि चवीला एकदम मस्त. बटाट्याची भाजी विविध प्रकारे करता येते. (Must try potato recipe : mattewale aloo is something not to miss on , summer recipes )अनेक रेसिपी आहेत. त्यापैकीच एक मस्त रेसिपी म्हणजे ताकातला बटाटा. करायला अगदी सोपी आहे आणि चवीला जबरदस्त. पाहा कशी करायची आणि नक्की करुन पाहा.
साहित्य बटाटा, दही, हळद, लाल तिखट, पाणी, धणे जिरे पूड, गरम मसाला, जिरे, लाल सुकी मिरची, लसूण, कोथिंबीर, मीठ, तेल
कृती१. बटाटे उकडून घ्यायचे. त्याची सालं सोलायची आणि नंतर त्याचे तुकडे करायचे. हातानेच करा. फक्त कुस्करु नका. तुकडे ठेवा. छान ताजं दही घ्यायचं. त्यात थोडं मीठ घालायचं. फेटून घ्यायचं आणि मग पाणी घालून त्याचं घट्ट ताक करायचं. जास्त पाणी नको.
२. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या आणि नंतर त्याची पेस्ट तयार करा. ठेचली तरी चालेल किंवा बारीक चिरली तर आणखी उत्तम. सुकी लाल मिरची घ्यायची आणि त्याचे तुकडे करायचे. कोथिंबीर निवडायची आणि बारीक चिरायची.
३. एका वाटीत थोडी हळद घ्यायची. लाल तिखट घ्यायचे. गरम मसाला घ्यायचा आणि धणे जिरे पूड घ्यायची. मसाले एकजीव करायचे आणि नंतर त्यात थोडं पाणी ओतायचं. ढवळून घ्यायचं मिक्स करुन घ्यायचं. त्याची पेस्ट तयार करायची. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची.
४. एका कढईत तेल घ्यायचं. तेल जरा गरम झाल्यावर त्यात जिरे घालायचे आणि छान परतून घ्यायचे. सुकी लाल मिरची घालायची आणि मस्त परतायची. लसूण घाला. लसूण जास्त वापरा म्हणजे चव छान येईल. लसूण परतल्यावर त्यात तयार केलेली मसाला पेस्ट घालायची, ढवळून घ्यायची. छान परतायचे. त्यात बटाटा घालायचा आणि एकजीव करुन घ्यायचे.
५. एक वाफ काढायची आणि मग त्यात ताक ओतायचे. जरा उकळायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परतून घ्यायचे. मस्त गरमागरम भात आणि ही रस्सा भाजी खा. तसेच पुरीसोबत खायलाही मस्त लागते.
Web Summary : Enjoy this easy and flavorful buttermilk potato recipe. It's a simple dish with potatoes, yogurt, and spices. Perfect with rice or puri, it's a refreshing summer treat that everyone will love. A must-try traditional recipe!
Web Summary : इस आसान और स्वादिष्ट छाछ आलू रेसिपी का आनंद लें। यह आलू, दही और मसालों के साथ एक सरल व्यंजन है। चावल या पूरी के साथ बिल्कुल सही, यह एक ताज़ा ग्रीष्मकालीन व्यंजन है जो सभी को पसंद आएगा। एक आज़माने योग्य पारंपरिक रेसिपी!