lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > मुळा पाहताच नाक मुरडणारेही आवडीने फस्त करतील मुळ्याची भाजी- बघा एकदम खास रेसिपी

मुळा पाहताच नाक मुरडणारेही आवडीने फस्त करतील मुळ्याची भाजी- बघा एकदम खास रेसिपी

Muli Ki Sabji Recipe: या एका खास पद्धतीने मुळ्याची भाजी करून पाहा. मुळा ज्यांना आवडत नाही, ते लोकही अगदी आवडीने ही भाजी खातील.(How to make radish sabji?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2024 01:47 PM2024-02-09T13:47:23+5:302024-02-09T13:48:10+5:30

Muli Ki Sabji Recipe: या एका खास पद्धतीने मुळ्याची भाजी करून पाहा. मुळा ज्यांना आवडत नाही, ते लोकही अगदी आवडीने ही भाजी खातील.(How to make radish sabji?)

Muli ki sabji recipe, How to make radish sabji? muli ki sabji in just 10 minutes, best food for winter | मुळा पाहताच नाक मुरडणारेही आवडीने फस्त करतील मुळ्याची भाजी- बघा एकदम खास रेसिपी

मुळा पाहताच नाक मुरडणारेही आवडीने फस्त करतील मुळ्याची भाजी- बघा एकदम खास रेसिपी

Highlightsहिवाळा संपायच्या आधी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी सांगितलेल्या या रेसिपीनुसार एकदा मुळ्याची भाजी करून पाहाच...

हिवाळ्यात गाजर, मुळा तसेच हिरव्या पालेभाज्या अगदी ताज्या आणि भरपूर प्रमाणात मिळतात. यापैकी गाजर आणि हिरव्या पालेभाज्या तर अनेक जण आवडीने खातात. पण मुळ्याकडे पाहून मात्र नाक मुरडतात. त्यांना मुळा नुसता तोंडी लावायला तर आवडत नाहीच, पण मुळ्याचे इतर पदार्थही ते फार आवडीने खात नाहीत. अशा मुळा न आवडणाऱ्या लोकांना तर या खास पद्धतीने केलेली मुळ्याची भाजी खायला दिली, तर ती मात्र ते अगदी आवडीने खातील आणि वारंवार मागतील (How to make radish sabji?). म्हणूनच तर हिवाळा संपायच्या आधी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी सांगितलेल्या या रेसिपीनुसार एकदा मुळ्याची भाजी करून पाहाच...(Muli ki sabji recipe)

मुळ्याची भाजी करण्याची रेसिपी 

 

साहित्य

१ मुळा

मुळ्याचा पाला

चिमूटभर हिंग

शेंगदाण्यांमध्ये अळ्या होऊ नयेत म्हणून २ साेपे उपाय, महिनोंमहिने चांगले टिकतील- वासही येणार नाही

२ ते ३ हिरव्या मिरच्या

१ टीस्पून चाट मसाला

१ टेबलस्पून तेल

चिमूटभर हळद

वेटलॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत सगळंच राहील ठणठणीत- रोज फक्त १ चमचा 'ही' चटणी खा

अर्धा टिस्पून ओवा

चवीनुसार लाल तिखट

चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी मुळा स्वच्छ धुवून घ्या आणि त्याची सालं काढून तो चिरून घ्या.

यानंतर मुळ्याचा पालाही धुवून चिरून घ्या. एरवी मुळ्याचा पाला फार खाण्यात येत नाही. पण त्याच्यातही अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे तो देखील खायला पाहिजे. 

केसांसाठी सर्वोत्तम असणारे ५ हेअर ऑईल, केस वाढतील भराभर- गळणंही कमी होईल

गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल टाका. तेल तापल्यावर ओवा आणि हिंग टाका. यानंतर हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून टाका.

हिरव्या मिरच्या परतून झाल्या की त्यात चिरलेला मुळा, हळद आणि मीठ घाला आणि सगळं मिश्रण टॉस करून घ्या. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या.

बैठ्या कामामुळे हिप्स फॅट, मांडीवरची चरबी वाढली? ३ उपाय- वाढलेली चरबी झरझर उतरेल 

साधारण ५ ते ७ मिनिटांनी झाकण उघडा आणि त्यात मुळ्याचा बारीक चिरलेला पाला आणि थोडा चाट मसाला घालून सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.

ही मुळ्याची गरमागरम भाजी तुम्ही पोळी, भाकरीसोबत खाऊ शकता. 

 

Web Title: Muli ki sabji recipe, How to make radish sabji? muli ki sabji in just 10 minutes, best food for winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.