प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) ही फक्त अभिनयासाठीच नाही तर तिच्या साध्या आणि मराठमोळ्या जीवनशैलीसाठीही ओळखली जाते. फिटनेसकडे कल असूनही मृणाल अस्सल भारीतय जेवणाची मोठी शौकीन आहे. विशेषत: तिला घरगुती चवीचे वांग्याचे भरीत खूपच आवडते. एका मुलाखतीत मृणालला तिचा आवडता पदार्थ कोणता असं विचारल्यानंतर तिनं वांग्याचं भरीत, वरण-बट्टी त्यावर तूप लिंबू हे पदार्थ आवडत असल्याचे सांगितले. अनेक मुलाखतीत तिनं पारंपारीक पद्धतीचे खान्देशी पदार्थ आवडत असल्याचा उल्लेख केला आहे. मराठमोळ्या पद्धतीनं केलेलं वांग्याचं भरीत, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला तिला खूप आवडतं. (Mrunal Thakur's Favorite Vangyach Bharit)
वांग्याचं भरीत करण्याची सोपी रेसिपी
वांग्याचं भरीत करण्यासाठी सर्व प्रथम मोठ्या आकाराचे हिरवे वांगे घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्याला मधून चिरा पाडून घ्या आणि आतमध्ये लसूण पाकळ्या आणि थोडं तेल लावा.
त्यानंतर गॅसच्या मंद आचेवर वांगी सर्व काळपट होईपर्यंत भाजून घ्या. वांगी व्यवस्थित भाजली नाही तर कच्ची राहण्याची शक्यता असते. एका भांड्यात वांगी काढून घ्या आणि सुरीच्या साहाय्यानं काळपट सालं काढून वांग्यातील गर देठापासून वेगळा करून काढून घ्या.
एका कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे मोहोरी, जीरं आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. या फोडणीत बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्या. कांदा परतवल्यानंतर त्यात आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान मऊ होऊ द्या.
त्यात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करा. आता यात मॅश केलेले भाजलेले वांगे घालून व्यवस्थित एकजीव करा. शेवटी भरपूर ताजी कोथिंबीर आणि चवीनुसार थोडा गूळ आणि दाण्याचे कूट घाला.
वाफेवर २ ते ३ मिनिटं शिजवा. गरमागरम झणझणीत वांग्याचं भरीत तयार आहे. हे भरीत तुम्ही कांदा आणि लिंबाच्या फोडीसोबत खाल्ल्यास त्याची चव अधिकच खुलते. वांग्यांचे भरीत ज्वारीची भाकरी, बाजरी भाकरी किंवा चपातीसोबतही उत्तम लागते.
Web Summary : Actress Mrunal Thakur loves authentic Indian food, especially Baingan Bharta. Her favorite is the Khandeshi style, enjoyed with jowar bhakri. The article shares a simple recipe for making this delicious dish at home.
Web Summary : अभिनेत्री मृणाल ठाकुर को भारतीय भोजन पसंद है, खासकर बैंगन भरता। उन्हें खानदेशी शैली पसंद है, जो ज्वार की रोटी के साथ आनंदित है। लेख में इस स्वादिष्ट व्यंजन को घर पर बनाने की विधि बताई गई है।