Join us
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब-संत्र-मीठ-सोडा.. अहाहा! घरच्याघरी प्या गारेगार गुलाबी केशरी ड्रिंक-मूड बदलून टाकणारी जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2026 15:03 IST

Most refreshing recipe : Orange and pomegranate soda recipe , must try summer recipes : चविष्टही आणि करायला सोपेही, उन्हाळ्यासाठी खास रेसिपी.

उन्हाळा सुरू झाला की शरीराला सतत थंड आणि ताजेतवाने वाटावे असे वाटत राहते. घामामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि थकवाही जाणवू लागतो. अशावेळी बाजारातील कोल्ड ड्रिंक्सऐवजी घरच्या घरी तयार केलेले नैसर्गिक पेय अधिक फायदेशीर ठरू शकते. (Most refreshing recipe : Orange and pomegranate soda recipe , must try )डाळिंब, संत्र, मीठ आणि सोडा वापरून तयार केलेले हे उन्हाळा स्पेशल ड्रिंक चवीला छान लागते आणि शरीरालाही ताजेतवाने ठेवण्यास मदत करते.

हे ड्रिंक तयार करण्यासाठी डाळिंबाचे दाणे आणि संत्र्याचा रस घ्यावा. दोन्ही रस वेगळे काढून घ्या. म्हणजे मस्त रंग येतो. एकत्र मिक्सरमधून फिरवले तर त्याला गडद रंग येईल . फ्रेश दिसणार नाही.  डाळिंबाचे दाणे मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस काढावा आणि त्यात ताज्या संत्र्याचा रस मिसळावा. आता त्यामध्ये चवीनुसार काळे मीठ घालावे. थोडा सोडा ओतायचा. पेयाला हलकी फेसाळ चव येते. आवडीनुसार थोडे मध किंवा साखर घालून हे मिश्रण थंड पाण्यासोबत एकजीव करावे. काही बर्फाचे तुकडे घातल्यास हे ड्रिंक आणखी मस्त होते.

डाळिंबामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि लोहाचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. उन्हामुळे आलेला थकवा कमी करण्यासाठी डाळिंब उपयुक्त मानले जाते. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते आणि शरीर फ्रेश वाटते. उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने शरीरातील मीठ कमी होते. अशावेळी या ड्रिंकमधील काळे मीठ शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करू शकते. 

हे पेय शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. उन्हातून घरी आल्यानंतर किंवा दुपारच्या वेळी हे ड्रिंक घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो. मात्र सोड्याचे प्रमाण खूप जास्त ठेवू नये. कोणतेही पेय मर्यादित प्रमाणात घेतल्यासच त्याचा योग्य फायदा मिळतो. घरच्या घरी सहज तयार होणारे हे नैसर्गिक ड्रिंक उन्हाळ्यात नक्कीच एक चांगला आणि चविष्ट पर्याय ठरू शकतो. शिवाय ते दिसतेही सुंदर त्यामुळे लहान मुलेही आवडीने पितात. ही रेसिपी नक्की करुन पाहा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pomegranate-Orange Soda: Refreshing Homemade Drink for Summer, Boosts Mood

Web Summary : Beat the summer heat with a homemade pomegranate-orange soda! This refreshing drink hydrates, provides energy with antioxidants and Vitamin C, and replenishes electrolytes. A healthy, tasty alternative to store-bought drinks.
टॅग्स :समर स्पेशलपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न