Moringa Leaves Benefits : वेगवेगळ्या भाज्या तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी, शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळवण्यासाठी किती फायदेशीर असतात हे वेळोवेळी एक्सपर्ट सांगतात असतात. आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी नेहमीच आवडीनं खात असाल. पण अजूनही अनेकांना हे माहीत नाही की, शेवग्याच्या शेंगाच नाही तर शेवग्याच्या पानांची भाजीही सुपरफूड असते. शेवग्याची पानं एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत. यात अॅंटी-ऑक्सीडेंट्स, क्लोरोफिल, व्हिटामिन सी, प्रोटीन, कॅल्शिअमसारखे पोषक तत्व भरभरून असतात.
वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, इतकी सगळी पोषक तत्व असल्यामुळेच या पानांची भाजी डायबिटीस, कॅन्सर, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग, डोळ्यांच्या आजारांचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर ठरते. जर आपल्याला आधीच डायबिटीस, कॅन्सर किंवा हाय ब्लड प्रेशरसारख्या आजारांनी पीडित असाल तर शेवग्याच्या पानांचा आहारात समावेश करा.
शेवग्याच्या पानांचे फायदे
ब्लड शुगर राहते कंट्रोल
जर आपण ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर शेवग्याची पानं आपल्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतात. शेवग्याच्या पानांमध्ये अॅंटी-डायबिटीक गुण असतात, जे डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर ठरतात. शुगरच्या रूग्णांनी या पानांची भाजी नियमितपणे खाल्ली पाहिजे.
हाय ब्लड प्रेशर कंट्रोल
शेवग्याची पानं हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठीही फायदेशीर ठरू शकते. यात पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं, जे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतं. सोबतच रक्तवाहिन्याही यानं हेल्दी राहतात. हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी या भाजीचा आहारात समावेश केला तर ब्लड प्रेशर नियंत्रित राहू शकतं.
कॅन्सरपासून बचाव
नियमितपणे जर शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली तर कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका कमी करता येऊ शकतो, असं सांगितलं जातं. कारण या अॅंटी-ऑक्सीडेंट, झिंक आणि व्हिटामिन सी सारखे पोषक तत्व असतात. हे तत्व कॅन्सरच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात आणि शरीराला कॅन्सर पेशींसोबत लढण्यास मदत मिळू शकते.
पचन तंत्र होतं मजबूत
शेवग्याच्या पानांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. जे पचन तंत्र मजबूत करण्यास मदत करतं. नियमितपणे ही भाजी खाल तर पोटासंबंधी समस्या जसे की, बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस दूर होतात.