Join us

मऊ, लुसलुशीत, टम्म फुगणारी मुगाची इडली! घ्या भरपूर प्रोटीन्स देणाऱ्या सुपरहेल्दी इडलीची सोपी रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2025 16:33 IST

Moong Idli Recipe: नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी हा पदार्थ अतिशय चवदार आहे.(easy and simple idli recipe for breakfast and kids tiffin)

ठळक मुद्देप्रोटीन्स आणि फायबर भरपूर प्रमाणात देणाऱ्या या इडल्या वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठीही अतिशय उत्तम आहेत. 

इडली, डोसा हे पदार्थ बहुतेक सगळ्यांनाच आवडतात. लहान मुलांप्रमाणेच घरातले वयस्कर लोकही हे पदार्थ अगदी आवडीने खातात. शिवाय ते पचायलाही खूपच हलके असतात. त्यामुळे नाश्त्याला, मुलांना डब्यात देण्यासाठी इडली, डोसा आवर्जून केलाच जाताे. आता इडली डोसा करण्यासाठी उडीद डाळ, तांदूळ आधी भिजत घालून मग ते आंबविण्यासाठी ठेवावे लागतात. असा हा वेळखाऊ कार्यक्रम नको असेल तर सरळ मूग किंवा मुगाची डाळ घ्या (moong idli recipe) आणि अगदी झटपट छान मऊ, लुसलुशीत पौष्टिक इडल्या करा (protein and fiber rich moong dal idli for weight loss). त्या कशा करायच्या त्याचीच ही खास रेसिपी. (easy and simple idli recipe for breakfast and kids tiffin)

मुगाची इडली करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ वाट्या मूग. मूग नसल्यास मुगाची डाळ वापरली तरी चालेल.

१ वाटी रवा

१ वाटी दही

साडीचा काठ ब्लाऊजमध्ये 'या' पद्धतीने वापरा! ब्लाऊज दिसेल हटके, स्टायलिश- पाहा ९ आयडिया

३ ते ४ हिरव्या मिरच्या

७ ते ८ लसूण पाकळ्या आणि आल्याचा लहानसा तुकडा

कांदा, टोमॅटो, गाजर, पत्ताकोबी, सिमला मिरची अशा सगळ्या भाज्यांचे काप मिळून दिड वाटी 

चवीनुसार मीठ 

 

कृती

सगळ्यात आधी मूग दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि ते ४ ते ५ तासांसाठी पाण्यात भिजत घाला. रात्रभर भिजत घातले तरी चालेल.

फरशांच्या गॅपमधला काळेपणा खूप वाढला? १ उपाय- जास्त न घासताही ५ मिनिटांत डाग गायब 

यानंतर भिजवलेले मूग किंवा मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. त्यातच हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लसूण आणि आलं घाला आणि बारीक वाटून घ्या. 

वाटून घेतलेली मुगाची डाळ एका भांड्यात काढा. त्यामध्ये रवा आणि दही घाला. सगळं एकदा हलवून घ्या आणि १० ते १५ मिनिटांसाठी झाकून ठेवून द्या.

 

यानंतर कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर अशा तुम्हाला ज्या पाहिजे ज्या भाज्या घ्या आणि मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या. अगदी पातळ प्युरी न करता थोड्या जाड्याभरड्याच ठेवा.

पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नसल्याने त्यांना कुबट वास येतो? ३ टिप्स- कपड्यांची दुर्गंधी जाईल 

या भाज्या तुम्ही तेलात परतून किंवा तशाच मुगाच्या डाळीच्या पिठामध्ये मिक्स करा. त्यामध्ये इनो आणि चवीनुसार मीठ घाला आणि नेहमीप्रमाणे त्याच्या इडल्या लावा. प्रोटीन्स आणि फायबर भरपूर प्रमाणात देणाऱ्या या इडल्या वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठीही अतिशय उत्तम आहेत. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.वेट लॉस टिप्स