दिवाळीच्या (Diwali 2025) निमित्तानं घरांघरात लाडू बनवले जात आहेत. पण गोड, तुपकट लाडू खायला अनेकांना नको वाटतं. बेसन लाडू, रवा लाडू याव्यतिरिक्त मुगाचे लाडूसुद्धा चवीला उत्तम लागतात. मुगाचे लाडू करण्याची सोपी रेसिपी पाहूया. करायला सोपे तितकेच पौष्टीक असे हे लाडू तब्येतीसाठी उत्तम पर्याय आहेत. १० ते १५ मिनिटांत हे पौष्टीक लाडू बनून तयार होतील.(How To Make Moong dal Ladoo)
लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य
हिरवी मुगाची डाळ- १ कप
पिठी साखर -३ कप, आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
साजूक तूप - १ कप
वेलची पूड- १ छोटा चमचा
सुका मेवा- बारीक चिरलेला,आवश्यकतेनुसार
मुगाचे पौष्टीक लाडू करण्याची सोपी रेसिपी
मुगाची डाळ स्वच्छ पुसून आणि निवडून घ्या. एका जाड बुडाच्या कढईत डाळ मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आणि खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्या. डाळ भाजायला साधारण १५-२० मिनिटे लागू शकतात. डाळ पूर्णपणे थंड होऊ द्या.
थंड झालेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे पीठ तयार करा. पीठ थोडे रवाळ असले तरी चालेल. एका भांड्यात तूप गरम करून घ्या. हे तूप लाडू वळताना वापरायचे आहे.
एका मोठ्या भांड्यात बारीक केलेले मुगाचे पीठ घ्या. त्यात पिठी साखर,वेलची पूड आणि बारीक केलेला सुका मेवा घालून चांगले मिसळून घ्या. साखरेच्या गुठळ्या राहू नयेत.
बहिणीसाठी ५०० रुपयांच्या आत घ्या कॉटन कुर्ता सेट्स; ८ स्वस्तात मस्त ड्रेसेस, पाहा
या मिश्रणात हळूहळू गरम केलेले तूप घालून मिश्रण एकजीव करा. मिश्रण कोमट असतानाच लाडू वळायला सुरुवात करा. मिश्रण हातावर सहज घेता येईल इतके गरम असावे. मुगाचे पौष्टीक लाडू तयार आहेत. हे लाडू हवाबंद डब्यात ठेवा.
दिवाळीसाठी घ्या मोत्यांचे सुंदर कानातले; ८ नव्या डिजाईन्स, सोन्यालाही लाजवतील अशा डिजाईन्स
जर तुम्ही गूळ वापरणार असाल, तर गूळ किसून किंवा बारीक करून पिठात घाला आणि तूप घालून लाडू वळा. लाडू वळण्यासाठी तूप कमी वाटल्यास, थोडेसे आणखी गरम तूप घालून वळा. या लाडूंमध्ये तुम्ही डिंक तळून घालू शकता, ज्यामुळे पौष्टिकता अधिक वाढेल.