Join us

फक्त कपभर मूग डाळीचे करा मस्त क्रिस्पी-पौष्टिक डोसे, नाश्त्यासाठी उत्तम पर्याय-खास रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 18:23 IST

Moong Dal Dosa Recipe : मूगडाळीचे डोसे हा अत्यंत पौष्टिक आणि उत्तम नाश्ता आहे.

पोहे, इडली, चहा चपाती शिवाय रोज नाश्त्याला वेगळं काय करावं सुचत नाही.  पोषक तत्वांनी परिपूर्ण मूग डाळ सर्वांच्याच स्वंयपाकघरात असते. (Moong Dal Dosa Recipe) मूग डाळीपासून तयार केलेला नाश्ता म्हणून एक परिपूर्ण खाद्य पदार्थ असू शकतो. त्यात तुम्ही बटाट्याचे किंवा न्युडल्सचे स्टफिंगही भरू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही डिश सतत खावीशी वाटते. मूग डाळीचे क्रिस्पी डोसे बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (How to make crispy moong dal dosa)

मूग डाळ डोसे बनवण्याची रेसिपी

१) हे डोसे बनण्यासाठी सगळ्यात आधी मूगाची डाळ २ तासांसाठी पाण्यात भिजवा. दोन तास डाळ भिजवल्यानंतर पाणी उपसून मिक्सरच्या भांड्यात ही डाळ घाला त्यात एक कप रवा, एक कप बेसन,१ आल्याचा तुकडा, १ मिरची, चमचाभर दही  घाला. थोडं पाणी घालून हे मिश्रण दळून घ्या.  दळल्यानंतर यात मीठ घालून ढवळून घ्या आणि ५ मिनिटं झाकून ठेवा.

२) एका तव्यावर तेल गरम करून त्यात चणा डाळ, उडीद , लसूण, आलं घालून परतून घ्या. या मिश्रणात कांदा, हळद, लाल तिखट घालून दळून घ्या. 

३) तवा गरम करून तेल पसरवून घ्या. त्यावर डोश्याचं पीठ घाला. डोसा वरच्या बाजूनं थोडा शिजला की त्यावर हे मिश्रण लावा. डोसा व्यवस्थित  शिजवून घ्या. गरमागरम डोसा तयार आहे खायला.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स