Join us

फक्त एक कप मूग डाळीचा करा खमंग - चविष्ट, स्पंजी ढोकळा, १५ मिनिटात डिश रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2023 12:49 IST

Moong dal Dhokla recipe, step by step sponge moong dal dhokla पचायला हलका - पौष्टीक असा घरीच करा मूग डाळीचा चविष्ट ढोकळा

रविवार म्हटलं की आपल्याला काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते. आपण नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं ट्राय करण्याचं प्रयत्न करतो. अनेक जण रोजचे पोहे, उपमा खाऊन कंटाळतात. जर आपल्याला हटके व नवीन काहीतरी खायची इच्छा झाली असेल तर, मूग डाळीचा ढोकळा ही रेसिपी ट्राय करून पाहू शकता.

ढोकळा अनेक प्रकारचे केले जातात. बेसन ढोकळा, रवा ढोकळा, खमण ढोकळा, हे ढोकळ्याचे प्रकार आपण खाल्ले असतील. पण आपण कधी मुग डाळीचा ढोकळा ही रेसिपी ट्राय करून पाहिली आहे का? एक कप मूग डाळीत स्पंजी - चविष्ट ढोकळा तयार होतो. चला तर मग या झटपट पदार्थाची कृती पाहूयात(Moong dal Dhokla recipe, step by step sponge moong dal dhokla).

मूग डाळ ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य

मूग डाळ - १ कप

बेसन - 2 चमचे

आंबट दही - 2 टेस्पून

तीळ - 1/2 टीस्पून

किसलेलं खोबरं - 1 टेस्पून

मोहरी - 1 टीस्पून

हळद - 1/2 टीस्पून

साखर - 1.5 टीस्पून

आले - 1 टीस्पून किसलेले

पावसाळ्यात कांदे - बटाटे लवकर सडतात, कोंब फुटतात? ३ टिप्स, कांदे बटाटे टिकतील भरपूर

हिरवी मिरची - २

तेल - 2 चमचे

फ्रुट सॉल्ट

चवीनुसार मीठ

कोथिंबीर

कृती

फिटनेस फ्रिक लोकांसाठी मूग डाळीचा ढोकळा नाश्ता म्हणून बेस्ट ऑप्शन आहे. ढोकळा करण्यासाठी सर्वप्रथम मूग डाळ ५ तास पाण्यात भिजत ठेवा. मूग डाळ भिजल्यानंतर त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात साखर, मीठ, हिंग, आल्याची पेस्ट, बेसन, हळद, दही, फ्रूट सॉल्ट घालून मिक्स करा.

पावसाळ्यात करायलाच हवा मेदू वड्यांचा खमंग-कुरकुरीत बेत, घ्या मेदूवड्याची पारंपरिक रेसिपी

एका ट्रेमध्ये तूप किंवा तेल लावून ग्रीस करा. त्यात तयार ढोकळ्याची पेस्ट घालून पसरवा. आता स्टीमरमध्ये १० ते १५ मिनिटांसाठी ठेवा. १० मिनिटानंतर चाकू किंवा टूथपिक घालून चेक करा, ढोकळा शिजला असेल तर, चाकुला ढोकळा चिकटणार नाही. यानंतर ढोकळा बाहेर काढून ठेवा, थंड झाल्यानंतर त्याचे चौकोनी तुकडे करा.

टेम्परिंगसाठी फोडणीच्या पळीत, मोहरी, तीळ आणि हिंग घालून मध्यम आचेवर तळून घ्या. यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून, तयार केलेले टेम्परिंग ढोकळ्यावर पसरवा. अशा प्रकारे मूग डाळीचा ढोकळा खाण्यासाठी रेडी. शेवटी त्यावर हिरवी कोथिंबीर भुरभुरा, व ढोकळा चटणीसोबत सर्व्ह करा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स