संध्याकाळच्यावेळी किंवा सकाळी काहीतरी चमचमीत खावंसं वाटलं तर तुम्ही झटपट पौष्टीक अशी मुगाची भजी करू शकता (How To make Moong Dal Bhaji). मुगाची भजी चवीला खूपच छान वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट लागते. ही भजी तुम्ही मुलांना डब्यातही देऊ शकता किंवा नाश्त्याला खाऊ शकता. मुगाची भजी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो केल्या तर भजी परफेक्ट होईल. (Moong Dal Bhaji Making Tips)
मुगाची भजी परफेक्ट होण्यासाठी सोप्या टिप्स
१) मुगाची डाळ किमान ३ ते ४ तास भिजवून ठेवा. जास्त वेळ भिजवली तर ती खूपच मऊ होते आणि भजी तेलकट होते.
२) डाळ वाटण्यापूर्वी चाळणीत ठेवून त्यातलं सर्व पाणी निथळून घ्या. डाळीत पाणी राहिल्यास पीठ पातळ होईल आणि भजी कुरकुरीत होणार नाही.
३) डाळ मिक्सरला लावताना ती एकदम मऊ करू नका. डाळ थोडी जाडसर किंवा रवाळ ठेवावी यामुळे भजीला छान टेक्सचर येतं. डाळ वाटताना पाणी घालू नका.
४) डाळ वाटून झाल्यावर ते पीठ एकाच दिशेनं ५ ते ७ मिनिटं जोरात फेटून घ्या. यामुळे पिठात हवा भरली जाते आणि भजी न फुगताही आतून हलकी आणि बाहेरून कुरकुरीत होते.
५) आलं, मिरची, लसूण यांची जाडसर पेस्ट तयार करून घ्या. अख्खे धणे आणि काळी मिरी किंचित कुटून पिठात घाला. यामुळे भजी हॉटेलसारख्या लागतात.
६) बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर हे साहित्य शेवटी घाला. ज्यामुळे भजीला एक वेगळाच कुरकुरीतपणा येतो.
७) तेल आधी कडकडीत तापवून घ्या आणि नंतर भजी सोडताना गॅसची फ्लेम मिडीयम ठेवा. कमी आचेवर भजी तेलकट होतात. तर मोठ्या आचेवर बाहेरून जळतात आणि आतून कच्च्या राहतात.
८) जर तुम्ही पीठ नीट फेटलं असेल तर सोडा घालण्याची गरजच येत नाही. सोड्यामुळे भजी जास्त तेल पितात. पिठात १ चमचा गरम तेलाचं मोहन घाला. याशिवाय १ ते २ चमचे तांदळाचं पीठ घातल्यास भजी बराचवेळ कुरकुरीत राहतात. ही भजी पुदीन्याची चटणी किंवा तळलेल्या मिरच्यांसोबत सर्व्ह करा.
Web Summary : Make perfect, crispy Moong Dal Bhaji at home! Follow these simple tricks: soak, drain, coarsely grind the dal. Fry in medium heat for best results. Enjoy!
Web Summary : घर पर बनाएं एकदम कुरकुरी मूंग दाल भजी! इन आसान टिप्स का पालन करें: भिगोएँ, छानें, दाल को दरदरा पीसें। बेहतरीन परिणाम के लिए मध्यम आंच पर भूनें। आनंद लें!