Join us

पावसाळा स्पेशल: गरमागरम भजी खाऊन झाल्यानंतर उरलेल्या पिठाचं काय करायचं? बघा ३ टेस्टी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2025 15:48 IST

What To Do With Leftover Pakoda Batter: पावसाळा म्हटलं की भजी आलीच..(Monsoon Special) पण पोटभर भजी खाऊनही नंतर पीठ उरलंच असेल तर?(3 delicious recipe from left pakoda batter)

ठळक मुद्देपुन्हा त्याची भजी तळून खाण्याची इच्छा नसेल तर या काही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता.

यावर्षी पावसाला जरा लवकरच सुरुवात झाली. ज्या मे महिन्यात उन्हाचा हाहाकार असतो, त्याच मे महिन्यात यावर्षी पावसाच्या सरी कोसळत आहेत. सगळीकडेच मुसळधार पाऊस हजेरी लावून गेला आहे आणि रोज थोडा का होईना पण बरसत असतोच. त्यामुळे यंदाचा उन्हाळा जरा लवकर संपला आणि पावसाळा सुरु झाला. आता पाऊस म्हटलं की त्याच्या जोडीला गरमागरम भजी हवीच.. मग तुम्ही ती कांदा भजी करा किंवा बटाटा भजी करा किंवा मग आणखी कोणते पकोडे करा.. पण भजी हवीतच.. आता पोटभर भजी खाऊन झाल्यानंतरही बरंच पीठ उरलं असेल (what to do with leftover pakoda batter?) आणि पुन्हा त्याची भजी तळून खाण्याची इच्छा नसेल तर या काही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता.(3 delicious recipe from leftover pakoda batter)

भज्यांच्या उरलेल्या पिठापासून होणाऱ्या चवदार रेसिपी

 

१. धिरडे

हा एक पौष्टिक पदार्थ आहे. भज्यांच्या पिठामध्ये थोडा रवा आणि थोडं दही घालून ते आणखी थोडं पातळ करून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची असं सगळं घाला

प्रत्येक महिलेने रोज खायलाच पाहिजे 'ही' चमचाभर चटणी! हाडांचं दुखणं थांबेल- केसही भराभर वाढतील 

आणि सगळं मिश्रण हलवून घ्या. आता या पिठाचे तुम्ही छान जाळीदार धिरडे करू शकता.

 

२. तळलेल्या मिरच्या

तळलेल्या मिरच्या हा देखील अनेकांच्या आवडीचा पदार्थ. खमंग मिरच्या जर जेवणात तोंडी लावायला असतील तर क्या बात है... ही रेसिपी करण्यासाठी थोड्या मोठ्या आकाराच्या फुगीर मिरच्या घ्या. त्या मिरच्यांना उभा छेद द्या. आता या मिरच्या भज्यांच्या उरलेल्या पिठामध्ये चांगल्या घोळून घ्या आणि मध्यम आचेवर खमंग तळून घ्या. तोंडी लावायला छान लागतात.

रात्री खूप थकल्यामुळे स्किन केअरसाठी वेळच नसतो? सोनाक्षी सिन्हा सांगते चमकदार त्वचेसाठी सोपी ट्रिक

३. भाजीमध्ये वापर

मेथी, पालक, सिमला मिरची, कांदा यांच्या जेव्हा भाज्या केल्या जातात तेव्हा बऱ्याच ठिकाणी या भाज्यांना थोडे बेसन पीठ लावले जाते. तसे पीठ लावण्याऐवजी तुम्ही भज्यांच्या उरलेल्या पिठातही या भाज्या करू शकता. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मोसमी पाऊसपाऊस