Lokmat Sakhi >Food > monsoon special recipe : पनीर कोलीवाडा-चमचमीत, कुरकुरीत आणि खमंग पदार्थ - पावसाळ्यात खा पौष्टिक

monsoon special recipe : पनीर कोलीवाडा-चमचमीत, कुरकुरीत आणि खमंग पदार्थ - पावसाळ्यात खा पौष्टिक

monsoon special recipe: Paneer Koliwada recipe- A must-try sparkling, crunchy and delicious dish : पनीर कोळीवाडा पावसाळ्यात तर करायलाच हवा. गरमागरम पदार्थ खायला एकदम मस्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2025 15:02 IST2025-07-01T14:41:48+5:302025-07-01T15:02:29+5:30

monsoon special recipe: Paneer Koliwada recipe- A must-try sparkling, crunchy and delicious dish : पनीर कोळीवाडा पावसाळ्यात तर करायलाच हवा. गरमागरम पदार्थ खायला एकदम मस्त.

monsoon special recipe: Paneer Koliwada recipe- A must-try sparkling, crunchy and delicious dish | monsoon special recipe : पनीर कोलीवाडा-चमचमीत, कुरकुरीत आणि खमंग पदार्थ - पावसाळ्यात खा पौष्टिक

monsoon special recipe : पनीर कोलीवाडा-चमचमीत, कुरकुरीत आणि खमंग पदार्थ - पावसाळ्यात खा पौष्टिक

पावसाळ्यात छान पनीर कोळीवाडा नक्की करा. (monsoon special recipe: Paneer Koliwada recipe- A must-try sparkling, crunchy and delicious dish)पनीरची भजी किंवा पकोडा चवीला एकदम मस्त असतो. करायला अगदीच सोपा आहे. 

साहित्य 
पनीर, तेल, लाल तिखट, हळद, आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ, जिरे पूड, चाट मसाला, हिंग, मीठ, काळीमिरी पूड, दही, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लावर, बेसन लिंबाचा रस

 

कृती
१.  पनीरचे जाड तुकडे करायचे. पातळ आणि बारीक तुकडे करु नका. जाड तुकडे करा. छान ताजे पनीर वापरा म्हणजे चव मस्त लागेल. पनीरचे तुकडे करुन झाल्यावर पनीर बाजूला ठेवायचे. आणि मसाला तयार करुन घ्यायचा.

२. आल्याचा तुकडा घ्यायचा. तसेच लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. आलं - लसूण- मिरची पेस्ट करायची. मिक्सरमध्ये वाटा किंवा मग ठेचून करा. मिक्सरची पेस्ट जास्त छान आणि पटकन होते.  एका परातीत तेल घ्यायचे. त्यात तयार कलेली आलं-लसूणच मिरची पेस्ट घ्यायची. चमचाभर हिंग घालायचे. तसेच चमचाभर लाल तिखट घालायचे. चमचाभर हळद घालायची आणि चवी पुरते मीठ घालायचे. 

३. मिश्रणात थोडी काळीमिरी पूड घाला आणि जिरे पूड घालायला अजिबात विसरु नका. त्यात चाट मसाला घाला मस्त चटपटीत चव लागेल. सगळे मसाले घालून झाल्यावर त्यात दोन चमचे ताजे गोड दही घालायचे आणि चमचाभर बेसन तसेच दोन चमचे तांदळाचे पीठ आणि चमचाभर कॉर्नफ्लावर घालून हाताने सगळं छान मिक्स करायचे. त्याची घट्ट पेस्ट तयार होते. 

४. पनीरचे तुकडे त्या पेस्टमध्ये घाला आणि मॅरिनेट करा. सगळ्या तुकड्यांना मसाला व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या. पनीरला मसाला लावल्यावर थोडा वेळ झाकून ठेवा. २० मिनिटे तरी झाकून ठेवा. 

५. गॅसवर तेल गरम करत ठेवा. एकदम मस्त कडक तेल तापल्यावर त्यात पनीरचे तुकडे सोडायचे आणि तळून घ्यायचे. रंग लाल होईपर्यंत परतायचे. बाहेरुन कुरकुरीत आणि आतून मऊ पनीर असे पनीर पकोडे तळून घ्यायचे. गरमागरम चहासोबत खायचे.   

Web Title: monsoon special recipe: Paneer Koliwada recipe- A must-try sparkling, crunchy and delicious dish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.