संज्योत कीर या पंजाबी शेफची ही रेसेपी फारच इंटरेस्टिंग आहे. बेसनाच्या लाडवाचे हे लिक्विड फॉर्म चविष्ट तर आहेच शिवाय गुणकारीदेखील आहे. सर्दी, पडसे, ताप, कणकण वाटत असेल किंवा संध्याकाळी फारशी जेवायची इच्छा नसेल, तेव्हा हे सूप ट्राय करा. हिवाळा, पावसाळा या ऋतूमध्ये गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेणे सर्वांनाच आवडते. अशातच पोटभरीची एखादी रेसेपी असेल तर जिभेला चव येईल आणि पोटदेखील शांत राहील. चला तर पाहूया कृती.
पंजाबी शिरा रेसेपी
साहित्य:
बदाम एक मूठभरतूप १ टेबलस्पूनबेसन १ टेबलस्पूनदूध २ कप हळद पावडर एक चिमूटकाळी मिरी पावडर एक चिमूटवेलची पूड एक चिमूटसुंठ पावडर एक चिमूटकेसर काही धागे (पर्यायी)चवीनुसार गूळ पावडर
कृती :
- सुरुवातीला बदाम एक मूठभर बारीक भरडून घ्या किंवा बारीक कापून घ्या.
- मंद आचेवर एक लहान सॉसपॅन ठेवा, तूप घाला आणि ते वितळू द्या. एक चमचा बेसन घाला आणि ते बिस्किटसारखे आणि सुगंधी होईपर्यंत सतत ढवळत राहा.
- आता, ढवळत असताना हळूहळू दूध घाला जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
- तुमचा शिरा अर्थात सूप किती घट्ट किंवा पातळ हवे यानुसार दूध दीड ते दोन कप दूध घाला.
- हळद, काळी मिरी, वेलची पूड, सुंठ पावडर आणि गरज वाटली तर केशर घाला.
- नीट ढवळून घ्या आणि मंद आचेवर उकळी येऊ द्या.
- बुडबुडे येऊ लागले की, चवीनुसार गूळ पावडर घाला. गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत ढवळत रहा.
- गरमच सर्व्ह करा, बदामाचे काप घालून सर्व्ह करा.