Join us

गोकुळाष्टमी स्पेशल : नैवेद्याला हवाच मनमोहक पारंपरिक पदार्थ, पाहा घरी मोहनथाळ करण्याची सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2025 16:10 IST

Mohanthal Sweet Mithai Recipe - Halwai Style : Perfect Mohanthal Recipe : Danedar Mohanthal : How To Make Mohanthal At Home : How to make Mohanthal Sweet Mithai Recipe at home : गोकुळाष्टमीला अनेक गोडाधोडाच्या पदार्थांसोबतच, यंदा मोहनथाळ देखील नक्की ट्राय करून पाहा...

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आता अवघा काही दिवसांवर आला आहे. या दिवशी बाळकृष्णाला नैवेद्य दाखवण्यासाठी अनेक गोडाधोडाचे पदार्थ घरोघरी तयार केले  जातात, आणि त्यातलाच एक खास पदार्थ म्हणजे मोहनथाळ! गोकुळाष्टमीचा सण आला की घराघरात विविध गोडधोड पदार्थांचा सुगंध दरवळू लागतो. भगवान (Mohanthal Sweet Mithai Recipe - Halwai Style) श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवात 'मोहनथाळ' ही खास मिठाई बनवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आजही जपली जाते. तुपात भाजलेल्या (Perfect Mohanthal Recipe) बेसनाचा सुगंध, त्यात मिसळलेला साखरेचा गोडवा (How To Make Mohanthal At Home) आणि वेलचीची मोहक चव हे सगळं मिळून मोहनथाळचा आस्वाद गोकुळाष्टमीचे आनंदी आणि उत्साही वातावरणात अधिकच भर पाडतो(How to make Mohanthal Sweet Mithai Recipe at home).

मोहनथाळ हा बेसन आणि साजूक तुपात तयार होणारा एक पारंपरिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. याची चव आणि सुगंध यामुळे हा पदार्थ सणासुदीच्या दिवसाला आणखी खास बनतो. हा पदार्थ करायला थोडा वेळ लागतो, पण एकदा खाल्ल्यावर आपण त्याची चव विसरूच शकत नाही. आपण गोकुळाष्टमीच्या सणाला काहीवेळा बाजारांतून मोहनथाळ विकत आणतो परंतु, विकतची मोहनथाळ मिठाई आणण्यापेक्षा यंदा घरच्याघरीच ही सोपी रेसिपी करुन पाहा.

साहित्य :- 

१. बेसन - १ कप २. साखर - १ कप ३. केशर काड्या - १० ते १५ काड्या ४. पाणी - गरजेनुसार५. साजूक तूप - ३ ते ४ टेबलस्पून ६. दूध - २ कप ७. जायफळ पूड - १/२ टेबलस्पून८. वेलची पूड - १/२ टेबलस्पून ९. ड्रायफ्रुटसचे काप - १/२ कप 

गोकुळाष्टमी स्पेशल : लोणी न वापरता करा १० मिनिटांत 'माखन मिश्रीचा' नैवेद्य -पाहा इन्स्टंट रेसिपी...

उरलेल्या फुलांच्या पाकळ्या टाका तव्यावर आणि 'असा' करा धूप झटपट, सुगंधाने दरवळेल घर... 

कृती :- 

१. एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात साजूक तूप आणि थोडे दूध घालून त्यात पीठ घोळवून घ्यावे. अशाप्रकारे बेसनाला दूध आणि साजूक तुपाचे मोहन लावावे. त्यानंतर हे बेसन पीठ झाकून १५ ते २० मिनिटे ठेवावे.  २. २० मिनिटांनंतर झाकून ठेवलेले बेसन पीठ हलकेच बोटांनी दाब देत मोडून घ्यावे. मग बारीक जाळीदार चाळणीने हे तयार बेसन पीठ व्यवस्थित चाळून घ्यावे. ३. एका कढईत साजूक तूप घेऊन ते व्यवस्थित वितळल्यावर त्यात चाळून घेतलेले बेसन घालावे. गॅस मंद आचेवर ठेवून बेसन पिठाला हलकासा सोनेरी रंग आणि रवाळ टेक्श्चर येईपर्यंत साजूक तुपात चांगले परतवून घ्यावे. 

खसाखसा घासूनही काळीकुट्ट कढई निघत नाही, इवलासा तुरटीचा खडा मिनिटांत करेल कढई कोरीकरकरीत स्वच्छ...

४. साजूक तुपात बेसन चांगले परतवून झाल्यानंतर गॅस बंद करून त्यात थोडे दूध घालावे. बेसन जितके दूध शोषून घेऊ शकतो तितके दूध हळूहळू ओतून घ्यावे. मग परत मंद आचेवर बेसन हलकेच भाजून थोडे घट्टसर, दाणेदार मिश्रण तयार करून घ्यावे. ५. दुसऱ्या एका भांड्यात पाणी साखर, वेलची व जायफळ पूड घेऊन त्याचा एकतारी असा पाक तयार करून घ्यावा. तयार पाक बेसनाच्या मिश्रणात घालावा. सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. ६. मग एक डिश किंवा केक टिन घेऊन त्यात बटर पेपर अंथरून हे मोहनथाळचे मिश्रण त्यात ओतून घ्यावे. चमच्याच्या मदतीने हलकेच दाब देत मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यावे. ७. सगळ्यात शेवटी यावर ड्राय फ्रुटसचे काप भुरभुरवून घालावे आणि मिश्रण गरम असतानाच सुरीच्या मदतीने चौकीनी वड्या कापून घ्याव्यात.

टॅग्स :अन्नपाककृतीजन्माष्टमीश्रावण स्पेशलश्रावण स्पेशल पदार्थ